दिवाळी हा असा सण आहे ज्याची तयारी काही महिने आधीच सुरू होते. याबरोबर आपले शरीर देखील थकते तसेच त्याचा आपल्या त्वचेवरही परिणाम होतो. या सणाच्या दिवशी खास स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात, मिठाईचा आस्वाद घेतला जातो. त्याचबरोबर तुम्ही तासनतास मेकअपमध्ये राहतात, त्यात आता हवामान बदलत आहे, या उत्सवाच्या काळात स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यास वेळ नाही आणि शेवटी प्रदूषणाचा वाईट परिणाम होतो. आता सणासुदीचा हंगाम संपत आला आहे, तेव्हा तुम्हीही घाई-गडबडीतून विश्रांती घ्या आणि तुमची त्वचा डिटॉक्स करा.

त्वचा पुन्हा चमकदार आणि निरोगी होण्यासाठी काय करावे?

इसेन्शियल तेल

तुमच्या त्वचेनुसार दररोज इसेन्शियल तेल वापरा आणि वर्कआउट्स देखील करा. यामुळे सण संपल्यानंतरही तुमचा चेहरा तजेलदार राहील.

खोलवर त्वचा साफ करणे

दिवाळीच्या सणानंतर तुमच्या त्वचेला डीप क्लीनिंग, स्क्रबिंग आणि टोनिंगची गरज असते. तुमच्या त्वचेची निगा राखण्याची दिनचर्या सुरू ठेवा आणि घरगुती फेस पॅकची मदत घ्या.

व्हिटॅमिन-ई

तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन-ई असलेली क्रीम आणि तेल वापरा. विशेषत: दिवाळीनंतर. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या, ज्याने चमकदार त्वचा मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

सनस्क्रीन

कोणत्याही परिस्थितीत सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे तुमच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

मेकअपपासून दूर राहा

दिवाळी साजरी केल्यानंतर, काही दिवस मेकअप वापरू नका आणि आपल्या त्वचेला श्वास घेऊ द्या.

एक्सफोलिएट

उत्सवानंतर अंगाला स्क्रब बाथ द्या. त्वचा हायड्रेट करण्यासाठी शिया, ऑलिव्ह आणि झेमानिया असलेली प्रोडक्ट वापरा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि रक्ताभिसरण वाढते.

शीट मास्क

दिवाळीनंतर त्वचा कोरडी होते, यासाठी हायड्रेटिंग शीट फेस मास्क लावा. त्यामुळे निर्जीव त्वचेला ओलावा मिळेल.

बर्फ लावल्याने चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात का? जाणून घ्या ‘हे’ ५ घरगुती उपाय

स्टीम घ्या

छिद्रे बंद करण्यासाठी आणि मुरुमांपासून बचाव करण्यासाठी दिवाळीनंतर चेहर्‍यावर वाफ घ्या. वाफ घेतल्याने चेहर्‍यावरील त्वचा स्वच्छ होते.

निरोगी आहाराचे पालन करा

दिवाळीत चविष्ट अन्नाचा आस्वाद घेतल्यानंतर, निरोगी मार्गावर परत येण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याची वेळ आली आहे.

व्यायाम करा

दिवाळीला आपण इतकं खातो की, त्यानंतर व्यायाम करणं अधिक महत्त्वाचं ठरतं. जर तुम्हाला काही काळ वर्कआउटसाठी वेळ मिळत नसेल, तर आजपासूनच वॉर्म अप करायला सुरुवात करा.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)