पावसाळा ऋतू सर्वांना आवडतो. पावसाळ्यातील मातीचा सुगंध आणि वातावरणातील थंडावा सर्वांना हवाहवासा वाटतो. मात्र , पावसाळा जितका आनंददायी असतो तितकाच तो आरोग्य आणि सौंदर्याच्या समस्याही घेऊन येतो. पावसाळ्यात अनेक संसर्ग पसरतात त्यामुळे आजारही उद्भवतात. यावेळी स्वतःची विशेष काळजी घेणं आवश्यक असते. पावसाळ्यात आपला सतत पाण्याशी संपर्क येत असतो. त्यामुळे पावसाळ्यात काही वेळा तुमचे पाय खराब होतात आणि त्यांचे सौंदर्य कमी होते. हे टाळण्यासाठी तुम्हाला पावसाळ्यात पायांची काळजी घेणं आवश्यक असते. तर जाणून घ्या पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी.

पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी?

१) पावसाळ्यात दिवसातून तीन वेळा पाय साबण लावून कोमट पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर त्यांना थंड पाण्याने पुन्हा धुवा. कोरड्या टॉवेलने पाय वाळल्यानंतर, फूट क्रीम लावा आणि मसाज देखील करा. पाय घाण होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
What happens to the body when you take cold showers in winter? Cold Water Bath Benefits
हिवाळ्यात थंड पाण्यानं अंघोळ केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? चांगलं की वाईट, जाणून घ्या
Mushrooms benefits Eating 5 Mushrooms Daily May Help Combat Heart Disease And Dementia
दररोज ५ मशरूम खाल्ल्याने शरिरावर काय परिणाम होतात; फायदे ऐकून लगेच आहारात समावेश कराल

२) वेळोवेळी पाय धुत राहा. घाणेरडे मोजे वापरू नका. जर तुम्ही घरी पेडीक्योर करत असाल तर तुम्ही वापरत असलेली उत्पादने तुमच्या पायांसाठी योग्य आहेत याची खात्री करून घ्या. पाय दगडाने चांगले घासून स्वच्छ करा. बोटांच्या दरम्यान विशेष स्वच्छता करा.

३) या ऋतूमध्ये, विशेषत: घोटा घासून स्वच्छ करा. चांगल्या दर्जाचे फूट स्क्रबर वापरा. झोपण्यापूर्वी आपले पाय चांगले धुवून झोपी जा. यासोबतच मॉइश्चरायझरही लावा, जेणेकरून पाय मऊ राहतील. या ऋतूमध्ये नखे जास्त लांब ठेवू नयेत. लांब नखंही अनेक आजारांना आमंत्रण देतात.

४) नखांमध्ये घाण साचली तर ती बॅक्टेरियांना आमंत्रण देते. पायाला सूज येत आहे असे वाटत असेल तर तुरटीच्या कोमट पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवा. जर पायांना खूप सूज येत असेल तर आठवड्यातून ३ किंवा ४ वेळा हे नक्की करा. यामुळे पायांच्या सुजेवर नक्कीच आराम मिळेल. बराच वेळ आराम मिळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

५) पावसाळ्यात चांगली पावसाळी चपला वापरा. शूज वैगरे घालणे टाळा. शूजमुळे पाणी साचून पाय खराब होऊ शकतात. त्यामुळे पायांचे आजार उद्भवण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात जास्त पाण्यात वावरू नका , त्यामुळे तुमच्या पायांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य होईल तेवढे पाय कोरडे ठेवा.

या टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमचे पाय ताजे आणि निरोगी ठेवू शकता.

Story img Loader