Weight Loss : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण व्यायाम आणि आहाराकडे लक्ष देत नाही. अयोग्य जीवनशैलीमुळे अनेकांना वजन वाढीच्या समस्येला सामोरे जावे लागते. वाढलेले वजन कमी कसे करायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी नेमके काय करावे, हे कळत नाही. काही लोक वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ते उपाय करतात पण त्याचा अनेकदा काहीही फायदा होत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वजन कमी करण्यासाठी तीन प्रकारचा काढा घेण्यास सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या. (Boost Weight Loss: 3 Kadha to Start Your Morning)

हेही वाचा : घरात डासांची दहशत वाढतेय? डासांचा नायनाट करण्यासाठी करा ‘हे’ तीन जबरदस्त उपाय

या व्हायरल व्हिडीओमध्ये डॉ. मानसी मेहेंदळे यांनी तीन प्रकारचे काढे वजन कमी करण्यास उपयु्क्त असल्याचे सांगितले आहे. त्या सांगतात, “वजन कमी करण्यासाठी मी एक खास डाएट सांगणार आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. जीम लावतात, व्यायाम करतात, अनेक पदार्थांचे सेवन करत नाही तरीसुद्धा काटा काही खाली उतरत नाही मग त्यासाठी कसं बॅलेन्स डाएट असावं की जेणेकरून आपला प्रोटिन इनटेक वाढेन आणि कार्ब्स कमी होतील. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यानंतर जिरे पाणी किंवा कढीपत्त्याच्या पानांचा काढा किंवा अळशीचा काढा हे आपल्याला एक दिवसानंतर घ्यायचे आहे. जर सोमवारी तुम्ही कढीपत्याचा पानांचा काढा घेतला त्यामुळे तुमच्या यकृताचे डिटॉक्सिफिकेशन होईल. जर तुम्ही जिऱ्याचे पाणी घेतले, किडनीचे तुमचे कार्य आहे, ते चांगले होते आणि जवसचा काढा घेतला तर हार्मोनल असंतुलनामुळे वाढलेले वजन कमी होते. हे तीन काढे तुम्ही घेतले तर तुमचे वाढलेले वजन कमी होऊ शकते.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : केस गळतात? चिडचिड होते? ‘या’ व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता; कोणते व्हिटॅमिन्स शरीरात काय काम करतात? घ्या जाणून…

drmanasitanviherbalclinic या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हाला वजन कमी करायचे आहे?”
आणखी एका युजरने लिहिलेय, “उपयुक्त माहिती” तर एका युजरने लिहिलेय, “मी दररोज हे तिन्ही काढे घेणार” काही युजर्सनी तर काढा कसा तयार करायचा, याविषयी विचारले आहे.