मोबाईल हा सध्या आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा घटक झाला आहे. स्मार्टफोन आल्यापासून तर सर्वच वयोगटातील लोकांचा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या मोबाईल कंपन्याही विविध सुविधा देऊन आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याने दिवसातील बहुतांश कामांसाठी या उपकरणाचा वापर केला जातो. इतकेच काय टेलिकॉम कंपन्याही आपल्या ग्राहकांना मोफत कॉलिंग, स्वस्तात इंटरनेट डेटा देत असल्याने मोबाईलचे एकप्रकारे व्यसन लागते आहे. अनेकांना सतत फोनवर बोलण्याची सवय असते. कधी कामाचा भाग म्हणून तर कधी उगाचच तासन् तास फोनवर बोलण्याची सवय असते.

मात्र अशाप्रकारे जास्त काळ फोनवर बोलण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते असे नुकतेच एका संशोधनावरुन समोर आले आहे. दिर्घकाळ फोनवर बोलणे मेंदूच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते. मुंबई आयआयटीचे प्राध्यापक गिरीशकुमार यांनी केलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. देशभरातील कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांनी नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. अर्ध्या तासाहून अधिक वेळ फोन कानाला लावून बोलण्याची सवय असल्यास त्या व्यक्तीला साधारणपणे १० वर्षांनी ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता दुपटीने वाढते असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

Mumbai University lacks faculty and courses delaying BBA and BCA for 2024 25 mumbai
मुंबई विद्यापीठात ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ अभ्यासक्रम रखडले, संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रम तयार नसल्याने अभ्यासक्रम रखडले
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
rahul kumar Success Story
Success Story : गरीब परिस्थिती, इंटरव्ह्यूला जाण्यासाठी नव्हते कपडे… परिस्थितीवर मात करून मिळवला ६७ वा क्रमांक
navi peth pune fire
पुणे: नवी पेठेतील अभ्यासिकेत आग
Aided private Ayurveda Unani colleges will get professors
अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांना मिळणार प्राध्यापक; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निवड समितीची रचना जाहीर
G N Saibaba
GN Saibaba Passed Away : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांचे निधन; रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
Career Guide to Become a Professor
चोकट मोडताना : प्राध्यापक व्हायचंय मला
wardha microvascular plastic surgery marathi news
प्लास्टिक सर्जरीने संभाव्य अपंगत्वावर मात, विदर्भात फक्त इथेच…

यासाठी गिरीशकुमार यांनी जवळपास १० हजार लोकांचा अभ्यास केला. हे लोक किती वेळ फोनवर बोलतात आणि त्यांना आरोग्याच्या कोणत्या समस्या उद्भवतात याची नोंद त्यांनी यामध्ये घेतली. त्यातून २० ते ३० मिनिटे मोबाईलवर बोलणाऱ्या लोकांपैकी ८० टक्के लोकांना कानदुखी आणि २० टक्के लोकांना डोकेदुखीचा त्रास असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. डोकेदुखीमुळे झोपेची समस्या, चिडचिड, स्मृतीभ्रंश, एकाग्रता कमी होणं अशा समस्या निर्माण होतात आणि या सर्व समस्यांचा परिणाम म्हणजे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असते. याविषयी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनीही मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. मोबाईलमधून येणारे रेडिएशन आरोग्यासाठी घातक असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूचा कर्करोग (ब्रेन कॅन्सर) होण्याचा धोका वाढत असल्याचेही गिरीशकुमार यांनी याआधी केलेल्या एका संशोधनातून समोर आले होते.