मोबाईल हा सध्या आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा घटक झाला आहे. स्मार्टफोन आल्यापासून तर सर्वच वयोगटातील लोकांचा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या मोबाईल कंपन्याही विविध सुविधा देऊन आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याने दिवसातील बहुतांश कामांसाठी या उपकरणाचा वापर केला जातो. इतकेच काय टेलिकॉम कंपन्याही आपल्या ग्राहकांना मोफत कॉलिंग, स्वस्तात इंटरनेट डेटा देत असल्याने मोबाईलचे एकप्रकारे व्यसन लागते आहे. अनेकांना सतत फोनवर बोलण्याची सवय असते. कधी कामाचा भाग म्हणून तर कधी उगाचच तासन् तास फोनवर बोलण्याची सवय असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र अशाप्रकारे जास्त काळ फोनवर बोलण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते असे नुकतेच एका संशोधनावरुन समोर आले आहे. दिर्घकाळ फोनवर बोलणे मेंदूच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते. मुंबई आयआयटीचे प्राध्यापक गिरीशकुमार यांनी केलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. देशभरातील कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांनी नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. अर्ध्या तासाहून अधिक वेळ फोन कानाला लावून बोलण्याची सवय असल्यास त्या व्यक्तीला साधारणपणे १० वर्षांनी ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता दुपटीने वाढते असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

यासाठी गिरीशकुमार यांनी जवळपास १० हजार लोकांचा अभ्यास केला. हे लोक किती वेळ फोनवर बोलतात आणि त्यांना आरोग्याच्या कोणत्या समस्या उद्भवतात याची नोंद त्यांनी यामध्ये घेतली. त्यातून २० ते ३० मिनिटे मोबाईलवर बोलणाऱ्या लोकांपैकी ८० टक्के लोकांना कानदुखी आणि २० टक्के लोकांना डोकेदुखीचा त्रास असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. डोकेदुखीमुळे झोपेची समस्या, चिडचिड, स्मृतीभ्रंश, एकाग्रता कमी होणं अशा समस्या निर्माण होतात आणि या सर्व समस्यांचा परिणाम म्हणजे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असते. याविषयी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनीही मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. मोबाईलमधून येणारे रेडिएशन आरोग्यासाठी घातक असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूचा कर्करोग (ब्रेन कॅन्सर) होण्याचा धोका वाढत असल्याचेही गिरीशकुमार यांनी याआधी केलेल्या एका संशोधनातून समोर आले होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talking more time on mobile cause health problems like brain tumor in future
Show comments