आजच्या काळात मोबाइल फोन वापरणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या हातात आपल्याला मोबाइल दिसतो मग भले तो सुशिक्षित असो की अशिक्षित.आपण नेहमी पाहतो की आपल्या आसपास कित्येक लोक तासनतास मोबाइल फोनवर बोलत असतात पण त्यामुळे दीर्घकाळानंतर त्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. मोबाइलच्या अतिवापरामुळे बऱ्याचदा असे म्हटले जाते की, ”मोबाइल ही गरज राहिलेली नसून व्यसन झाले आहे.” याचाच प्रत्यय देणारी माहिती सध्या एका संशोधनातून समोर आली आहे.

जास्त वेळ मोबाइल फोन वापरण्यामुळे वाढू शकतो उच्च रक्तदाब विकसित होण्याचा धोका

मोबाइलचा वापर करणे गरजेचे आहे पण त्याच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्यावर आणि आपल्या निरोगी जीवनशैलीवर खूप वाईट परिणाम होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनातून समजले आहे की, दर आठवड्याला ३० मिनिटे म्हणजेच अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मोबाइल फोनवर बोलण्यामुळे उच्च रक्तदाब विकसित होण्याचा धोका १२ टक्क्यांनी वाढतो.

L&T, Subramaniam , 90 hours work ,
काम महत्त्वाचेच, पण जगणे अधिक महत्त्वाचे…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Natasha Poonawalla and Adar Poonawalla
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…”
amaltash movie
सरले सारे तरीही…
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका
This hack might help break your phone addiction in just 6 minutes, increase concentration by 68 percent
पालकांनो अवघ्या ६ मिनिटांत सुटेल मुलांचे मोबाईलचे व्यसन; तर एकाग्रता ६८ टक्क्यांनी वाढेल, डॉक्टरांनी सांगितली ट्रिक
Zomato Zepto Swiggy field workers have no legal rights
किती काळ पायदळीच तुडवले जाणार? ‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क
Abdul Sattar
Abdul Sattar : एकनाथ शिंदेंची साथ सोडणार का? अब्दुल सत्तार म्हणाले, “पुढच्या अडीच वर्षांत….”

”१० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या जागतिक लोकसंख्येपैकी जवळजवळ तीनचतुर्थांश लोकांकडे मोबाइल फोन आहे. मोबाइल फोन रेडिओ फ्रिक्वेन्सी ऊर्जेच्या कमी पातळीचे उत्सर्जन करतात, ज्याचा संबंध अल्पकालीन संपर्कानंतर रक्तदाब वाढण्याशी जोडला गेला आहे, असे अभ्यासात म्हटले आहे.

हेही वाचा : सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती? ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

उच्च रक्तदाब आहे हृदयविकारासंबधी मुख्य धोकादायक घटक

उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक या विकारांसाठी एक मुख्य धोकादायक घटक आहे आणि जागतिक स्तरावर अकाली मृत्यूचे मुख्य कारण ठरू शकते.”लोक किती मिनिटे मोबाइलवर बोलण्यात घालवतात याचा हृदयाच्या आरोग्यासाठी जास्त धोका असतो. जास्त मिनिटे म्हणजे जास्त धोका” असे चीनच्या ग्वांगझू येथील सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीचे अभ्यास लेखक शियानहुई किन यांनी सांगितले.

दीर्घकाळानंतर दिसून येतात दुष्परिणाम!

प्रो.किन यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे, हॅण्ड्स-फ्री सेटअप वापरल्याने उच्च रक्तदाब विकसित होण्याच्या शक्यतेवर कोणताही परिणाम झाला नाही, पण आता परिस्थिती बदलत असल्याचे दिसते. काही लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम चटकन ओळखले जाऊ शकतात, परंतु काही लोकांमध्ये ते शांतपणे कार्य करतात आणि अचानक एखाद्या आजाराच्या स्वरूपात आपल्यासमोर येऊ शकतात.

हेही वाचा : थंड की गरम, केस धुण्यासाठी कोणते पाणी योग्य? ते आठवड्यातून किती वेळा धुवावे? जाणून घ्या, काय करावे, काय नाही?

सुमारे सात टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसून आली

युरोपियन हार्ट जर्नल डिजिटल हेल्थ मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासादरम्यान, यूके बायोबँकच्या डेटाचा वापर करून फोन कॉलवर बोलणे आणि उच्च रक्तदाब यांच्यातील संबंध तपासण्यासाठी ३७ ते ७३ वयोगटातील एकूण २१२,०४६ प्रौढांचा समावेश करण्यात आला होता.

अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की, १२ वर्षांपर्यंत आठवड्यातून एकदा किंवा अनेक वेळा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ फोनवर बोलणाऱ्या १३९,८४ (सुमारे सात टक्के) लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळली. इतकेच नाही तर याच अभ्यासात एक गट असाही होता इतका जास्त वेळ फोनवर बोलत नव्हता. जेव्हा संशोधकांनी या दोन गटांची तुलना केली तेव्हा त्यांना असे आढळून आले की, फोनवर बराच वेळ बोलणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका अनेक पटींनी जास्त आहे.

Story img Loader