प्रत्येकाला निरोगी, चमकदार त्वचा हवी असते. पण धूळ, माती, प्रदूषण आणि उन्हामुळे त्वचेवरील तेज कमी होते. या गोष्टींचा केवळ आपल्या बॉडी ऑर्गन्सवरच नाही तर त्वचेवरही गंभीर परिणाम होत असतो. ऊन आणि प्रदूषणामुळे तुमची त्वचा खूप टॅन होते. यावेळी स्कीनवरील टॅन काढण्यासाठी अनेक जण पार्लरमध्ये डिटॅनसारख्या महागड्या ट्रिटमेंट करून घेतात. तर मार्केटमध्येही अनेक डिटॅन प्रोडक्ट उपलब्ध आहेत, जे त्वचा चमकदार आणि निरोगी होईल असा दावा करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का, स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा उपयोग करून तुम्ही त्वचेवरील डिटॅन हटवू शकता. यासाठी तुम्हाला घरच्या घरी डिटॅन साबण कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. अगदी २०० रुपयांत तुम्ही तीन ते चार डिटॅन साबण बनवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्रामवर ब्यूटी टिप्स डेलिकेअर या अकाउंटवरून आपण घरच्या घरी डिटॅन साबण कसा बनवायचा जाणून घेऊ…

डिटॅन साबण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

१) एक वाटी मसूर डाळीचे पीठ
२) एक वाटी गव्हाचे पीठ
३) दोन व्हिटॅमिन E च्या कॅप्सूल
४) दोन चमचे कॉफी पावडर
५) एक चमचा नारळाचे तेल
६) गुलाब पाणी
६) सोप बार

डिटॅन साबण बनवण्याची कृती

१) डिटॅन साबण बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक वाटी मसूर डाळीचे पीठ, त्यात गव्हाचे पीठ , दोन चमचे कॉफी पावडर, दोन व्हिटॅमिन E च्या कॅप्सूल, एक चमचा नारळाचे तेल मिक्स करा.

२) यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या आणि त्यात थोडे-थोडे करून गुलाब पाणी मिक्स करा. गुलाब पाणी टाकल्यानंतर एक पेस्ट तयार झाली असेल.

३) आता सोप बार घ्या, हे सोप बार तुम्ही कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून मागवू शकता. यासाठी तुम्ही Soap bar for soap making कीवर्ड वापरून सर्च करू शकता. अशाप्रकारे सोप बार मागवा, जे साधारण २०० ते ३०० रुपयांदरम्यान असतील.

४) या सोप बारचे छोटे-छोटे तुकडे करून डबल बोयलिंग सिस्टमच्या माध्यमातून ( यासाठी एका भांड्यात पाणी गरम करा, त्यात पुन्हा एक छोटे भांडे ठेवा आणि त्यात साबण टाका) ते गरम करून घ्या. हे सोप डायरेक्ट गरम करू नका, नाही तर ते भांड्याला चिकटून राहतील.

५) आता सोप बार पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर त्यात तुम्ही तयार केलेली पेस्ट टाका आणि चांगल्याप्रकारे मिक्स करा.

६) आता डिटॅन साबणाची तयार पेस्ट एका साबणाच्या आकारासारख्या साच्यात टाका आणि थंड होण्याची वाट पाहा. यासाठी दोन ते तीन तास लागतात. यानंतर तुमचा डिटॅन साबण वापरण्यासाठी तयार असेल.

७) हा डिटॅन साबण एकप्रकारे नैसर्गिक असल्याने याच्या वापरामुळे कोणतेही साईड इफेक्ट होण्याची शक्यता फार कमी आहे. तरीही त्वचेवर कोणताही प्रयोग करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tan removal soap how to make detan soap at home sjr