भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एसयूव्हीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असताना टाटा हॅरियर लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार आहे. H5X संकल्पनेवर आधारित या एसयूव्ही दमदार इंजिनसह आकर्षक लूकमध्ये असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही कार रस्त्यावर धुमाकूळ घालणार असेच दिसते. २०१८ ऑटो एक्स्पोमध्ये या गाडीचे कन्सेप्ट दाखवण्यात आले होते तेव्हापासून या गाडीबाबत लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. २.० फिलोसॉचा प्रयोग केलेले टाटा मोटर्सची ही पहिलीच कार आहे. याचबरोबर लॅण्ड रोव्हर D8 मध्ये असलेले आणि जग्वार लॅण्ड रोव्हरच्या साथीने विकसित केलेले ऑप्टीमल मॉड्यलूर इफिशिएंट ग्लोबल अॅडव्हान्स ऑर्किटक्चरचा टच कारला मिळाला आहे. टाटा हॅरियर नव्या OMEGARC प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टाटा मोटर्स आणि जॅग्वार लँड रोव्हर यांनी ही कार डेव्हलप केली आहे. या कारचे डिझाइन काही लोकांना आवडले असून काहींना गोंधळात टाकणारे आहे किंवा अशा प्रकारच्या अपारंपरिक डिझाइनची सवय करून घ्यायला काहींना वेळ लागू शकतो. हॅरीअरला एक आक्रमक आणि भारदस्त एसयूव्ही बनवण्यासाठी टाटाने मेहनत घेतली आहे. २३ जानेवारी रोजी भारतामध्ये ही गाडी लाँच होणार आहे.
गाडीची ठेवणं ही लँड रोव्हरच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. त्यामुळे गाडीचा व्हालीबेस मोठा आहे. या गोष्टीचा सर्वाधिक फायदा होतो तो गाडीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना. मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी लेग स्पेस देण्यात आली आहे. सपाट सीट असल्यामुळे तीन जण कुठल्याही अडचणीशिवाय बसू शकतात. ही कार थर्मिस्टो गोल्ड, कॅलिस्टो कॉपर, एरियल सिल्व्हर, टेलिस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट अशा पाच रंगात उपलबद्ध असणार आहे. सिटी, इको आणि स्पोर्ट्स अशाप्रकारच्या तीन ड्रायव्हिंग मोड्समध्ये ही कार उपलब्ध असेल.
लँड रोव्हरचा टच लाभलेली टाटा हॅरियरमध्ये सर्व अत्याधुनिक सुरक्षाविषयक फिचर्सचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये सिटबेल्ट रिमाइंडरसह 3-पॉइंट सिटबेल्ट्स देण्यात आले आहेत. या एसयूव्हीमध्ये अनेक शानदार फिचर्स आहेत. एकूण चार व्हेरिअंट्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझेडचा समावेश आहे. यामध्ये फॉलो-मी-होम फंक्शनसह प्रोजेक्टर लेंस हेडलॅम्प्स, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स, फॉग लॅम्प, एलईडी टेललाइट्स आणि आउट साइड व्ह्यू मिररमध्ये टर्न इंडिकेटर्स आहेत.
किंमत –
‘नव्या एसयूव्हीची किंमत 16 ते 21 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. या कारच्या बेसिक व्हेरिअंटची (एक्सई) किंमत 16 लाख रुपये, तर टॉप व्हेरिअंटची (एक्सझेड) किंमत 21 लाख रुपये असू शकते. ही ऑन-रोड किंमत असून यामध्ये रजिस्ट्रेशन खर्च, विमा आणि इतर करांचा समावेश नाही.