जगभरातील मौल्यवान १०० ब्रँडमध्ये टाटा उद्योग समूहाने स्थान मिळवले आहे. इंग्लंडमधील ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने २०१९ मधील जगभरातील अव्वल ५०० ब्रँडची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये टाटा उद्योग समूहाला ८६ व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. गतवर्षी या यादीत टाटाला १०४ स्थान मिळाले होते. जगभरातील अव्वल १०० ब्रँडमध्ये भारतातील ही एकमेव कंपनी आहे. तर अॅमेझॉन कंपनी १३.३६ लाख कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह पहिल्या स्थानावर आहे.
जगातील अव्वल १०० मध्ये देशाची एकमेव कंपनी बनणे टाटा समूहाला भविष्यात सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत करेल, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले.