कामामुळे असो की सवयीमुळे पण जवळपास ९० टक्के लोक चूकीच्या जीवनशैलीचे अनुकरण करत असतात. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
अयोग्य जीवनशैलीमुळे झोप न येणे, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबासारखे आजार होणे सामान्य बाब झाली आहे, पण लाईफस्टाईलशी निगडित या आजारांचे स्वत:चे असे काही दुष्परिणाम असतात.
टॅटूमुळे त्वचा रोग होण्याची शक्यता तर असतेच. पण आता संशोधनात टॅटूमुळे लिव्हरचा आजार होण्याचा धोकासुद्धा उद्भवतो असे आढळले आहे. टॅटू गोंदवणे आणि कावीळ होण्याचा जवळचा संबंध आहे, असा दावा अमेरिकन संशोधकांनी केला आहे. कावीळचा विषाणू रक्तातून जास्त पसरतो आणि टॅटू गोंदवल्याने हा धोका अनेक पटीने वाढतो. टॅटू गोंदवताना हिपॅटायटीस C (कावीळ) चा विषाणू शरीरात अनेकवेळा प्रवेश करतो. हा विषाणू अनेक वर्षे शरीरात सुप्तावस्थेमध्ये राहतो. त्यामुळे व्यक्तीला त्याचा पत्ता लागत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2013 रोजी प्रकाशित
टॅटूमुळे होऊ शकतात आजार
कामामुळे असो की सवयीमुळे पण जवळपास ९० टक्के लोक चूकीच्या जीवनशैलीचे अनुकरण करत असतात.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-11-2013 at 11:11 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tatto can affect on your health