Tea and headache, correct time to have tea: अरे यार, आज चहा प्यायले/ प्यायलो नाही म्हणूनच डोकेदुखी सुरू झालीय, असं वाक्य अनेकदा आपण टी-लवर्सकडून ऐकत असतो. भारतात जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात दिवसातून कमीत कमी एकदा तरी चहा बनतो. आपल्या देशात चहा पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. चहाप्रेमींची चहा पिण्याची वेळ चुकली की आपसुकच त्यांचा दिवस खराब जातो आणि डोकेदुखी ओढावते, असं अनेकदा आपण ऐकलं आहे. पण, खरंच चहाचा डोकेदुखीशी काही संबंध आहे का? ते जाणून घेऊयात.

चहा हे जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. तसेच केमोमाईल ते ग्रीन टीपासून चहाचे विविध प्रकार आहेत, ज्याचे आपल्या शरीरासाठी विविध फायदे किंवा तोटे असू शकतात. पण, इथे जेव्हा आपण चहाचा उल्लेख करतो तो म्हणजे, ब्रिटीश भारतापासून चालत आलेला दुधाचा चहा.

Sedentary lifestyle leads to permanent back pain Orthopedic experts said the solution
बैठ्या जीवनशैलीमुळे जडतेय कायमची पाठदुखी! अस्थिविकारतज्ज्ञांनी सांगितले उपाय…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Are monk fruit sweeteners safe for you
Monk Fruit : साखरेपेक्षाही गोड असतं ‘हे’ फळ! अतिसेवनानं वाढतील हृदयाच्या समस्या; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…
car during Diwali Important tips
दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होऊ शकते तुमच्या गाडीचे नुकसान; सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स
loksatta kutuhal facial recognition with artificial intelligence
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवणे १
Risk of Heart Attack During Angiography
अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Diabetes 40 minute yoga reduce diabetes risk and control blood sugar spikes
४० मिनिटांच्या योगाने ४० टक्क्यांनी कमी होईल मधुमेहाचा धोका? अभ्यासातून माहिती आली समोर, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Coriander Juice benefits
Coriander Juice: रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? वाचून व्हाल अवाक…

तज्ज्ञांच्या मते, चहाचा तुमच्या डोकेदुखीशी (Tea and headache) थेट तसा काही संबंध नसतो. इंडिया टुडेनुसार, मुंबईतील ज्येष्ठ चिकित्सक आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. रूही पिरजादा म्हणतात, “डोकेदुखीच्या उपचारासाठी केलेले चहाचे सेवन यात प्रत्यक्ष संबंध नसला, तरी डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी वाढू शकते आणि चहा हायड्रेशनसाठी मदत करू शकतो, असा विचार करणे काही अयोग्य नाही.”

फोर्टिस हॉस्पिटल, नोएडा येथील न्यूरोलॉजीच्या संचालक डॉ. ज्योती बाला शर्मा म्हणतात, चहा सायनसचा त्रास कमी करू शकतो, तसेच चहा सायनुसायटिसमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम देऊ शकतो.

हेही वाचा… आतड्यांमध्ये बिघाड होताच शरीर देऊ लागतं ‘हे’ संकेत! फक्त पोटच नव्हे तर त्वचा, मूडमधील ‘या’ बदलांकडे सुद्धा द्या लक्ष

चहा तुमच्या डोकेदुखीसाठी मदत करू शकतो, याचे आणखी एक कारण म्हणजे ब्लॅक टी. ब्लॅक टीमध्ये कॅफिन असतं, ज्यामुळे तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते.

कॅफिनमुळे रक्तवाहिन्या आंकुचन पावू शकतात, संभाव्यतः कॅफिन डोकेदुखीची लक्षणे कमी करू शकते.

*एक कप (१५० मिली) कॉफीमध्ये ८०-१२० मिलीग्राम कॅफिन असते, इन्स्टंट कॉफीमध्ये ५०-६५ मिलीग्राम असते आणि चहामध्ये ३०-६५ मिलीग्राम कॅफिन असते.

मुख्य कारणे

चहा डोकेदुखीवर मदत करू शकतो, परंतु त्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो. चहा तुमच्या डोकेदुखीला कशाप्रकारे मदत करू शकतो याबद्दल तज्ज्ञांचा अंदाज खालीलप्रमाणे:

हायड्रेशन (Hydration)

डॉक्टर पिरजादा म्हणतात, “चहा हायड्रेशनसाठी मदत करू शकतो, असा विचार करणे फायदेशीर ठरेल. कारण डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते.”

मसाले (Spices)

चहा डोकेदुखी दूर करण्यास मदत करू शकतो, याचे एक कारण म्हणजे त्यातील घटक. आले, वेलची आणि दालचिनी यांसारखे मसाले, सामान्यतः चहामध्ये वापरले जातात, त्यात दाहकविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता कमी होते. उदाहरणार्थ, २०२० च्या अभ्यासात असे आढळून आले की, ‘आले’ हे मायग्रेनच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे.

अरोमाथेरपी (Aromatherapy)

सुगंधामुळे (Aroma) तुमची डोकेदुखी बरी होऊ शकते हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा वैज्ञानिक पुरावा नसला तरीही काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, चहामधील मसाल्यांमुळे तणावसंबंधित डोकेदुखी कमी होऊ शकते.

चहामुळे डोकेदुखी होऊ शकते का? (Can Tea cause headache?)

डॉ. पिरजादा म्हणतात की, जास्त चहा आणि कॉफी प्यायल्याने डोकेदुखी होऊ शकते. कारण जेव्हा या दोन्ही पेयांचे नियमितपणे सेवन केले जाते, तेव्हा मेंदूतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात; चहा-कॉफीचे अचानक सेवन केल्यावर किंवा ही प्येय दीर्घकाळानंतर प्यायल्यामुळे, ते व्हॅसोडिलेशन (रक्तवाहिन्यांचे रुंदीकरण) होऊ शकते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.

डॉ. शर्मांच्या म्हणण्यानुसार, चहा लोह आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांच्या शोषणात व्यत्यय आणू शकतो, ज्यामुळे शरीरात कमतरता निर्माण होते. “चहाचे काही दुष्परिणामदेखील आहेत, ते म्हणजे- लोहाचे खराब शोषण, चिंता, जठराची सूज, अस्वस्थता आणि कमी ते गंभीर डोकेदुखीसह झोप.

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती? (Right time to drink tea)

ICMR ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये संशोधन संस्थेने, जेवणाच्या किमान एक तास आधी आणि नंतर चहा आणि कॉफीचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला आहे.

“झोपायला जाण्याआधी चहाचे सेवन करू नये, कारण त्यामुळे निद्रानाश आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डोकेदुखी होऊ शकते. कॅफिन असलेल्या चहामुळे केवळ डोकेदुखीच होऊ शकत नाही, तर सामान्य थकवादेखील येतो,” असं डॉ. शर्मा म्हणतात.

तात्पर्य

म्हणून, गरम चहाचा कप तुमच्या डोकेदुखीवर उपाय ठरेल अशी अपेक्षा करू नका, डोकेदुखी पुरेसे पाणी न पिण्यापासून ते हार्मोनल बदलांपर्यंत विविध कारणांमुळे होऊ शकते.