Uric Acid: शरीरात युरिक अॅसिड वाढत असेल तर खूप त्रास होतो. प्रत्येकाच्या शरीरात युरिक अॅसिड तयार होते आणि किडनी ते फिल्टर करून सहजपणे शरीरातून काढून टाकते. ज्या लोकांचे मूत्रपिंड यूरिक अॅसिड काढून टाकत नाहीत, त्यांच्या शरीरात क्रिस्टल्सच्या स्वरूपात हे अॅसिड जमा होऊ लागते आणि त्यामुळे गाऊटची समस्या निर्माण होते.

युरिक अॅसिड वाढल्याने हात-पायांच्या सांध्यात दुखणे, उठता-बसता त्रास होणे, बोटांना सूज येणे, सांध्यांमध्ये गाठी बनणे, बोटांना वेदना होणे, यांसारखे त्रास होतात. त्यामुळे युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काही पदार्थ खाल्ल्याने युरिक ऍसिडचे प्रमाण झपाट्याने वाढते.

( हे ही वाचा: हातात दिसणारी ‘ही’ १२ लक्षणे देतात डायबिटीज असल्याचे संकेत; Blood Sugar वाढल्यास हातावर दिसतात ‘या’ गंभीर खुणा)

चहा आणि कॉफी ही पेये आहेत जी लोकआवडीने पितात. युरिक अॅसिड असलेल्या रुग्णांना चहा-कॉफीच्या सेवनाबद्दल अनेकदा द्विधा स्थिती असते. काही लोकांचा असा विश्वास आहे की चहा आणि कॉफीच्या सेवनाने यूरिक अॅसिड वाढू शकते. यात कितपत तथ्य आहे हे आयुर्वेद तज्ज्ञ सलीम झैदी यांच्याकडून जाणून घ्या.

चहा प्यायल्याने युरिक ऍसिड वाढू शकते का?

खाण्यापिण्यात आढळणाऱ्या रसायनाला प्युरीन म्हणतात. ज्या पदार्थांमध्ये हे रसायन जास्त असते, ते आपल्या शरीरात जाऊन युरिक अॅसिडची पातळी वाढवतात. दुधाचा चहा प्यायल्याने युरिक अॅसिडची समस्या वाढू शकते. दुधात फॅट जास्त असते ज्यामुळे युरिक अॅसिड वाढू शकते. दुधाचा चहा एंझाइमच्या उत्पादनावर परिणाम करतो ज्यामुळे यूरिक अॅसिडमध्ये वाढ होऊ शकते. युरिक अॅसिडच्या रुग्णांनी चहाचे सेवन केल्यास गाउटची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. युरिक अॅसिडच्या रुग्णांना चहा घ्यायचा असेल तर दूध आणि साखरेशिवाय चहा घ्यावा लागेल.

( हे ही वाचा: शरीराच्या ‘या’ भागांमध्ये होऊ लागल्या वेदना, तर समजून जा कोलेस्ट्रॉल वाढत आहे, जाणून घ्या High Cholesterol ची लक्षणे)

कॉफी यूरिक ऍसिड नियंत्रित करते का?

जर तुम्हाला जास्त यूरिक अॅसिडची समस्या असेल तर तुम्ही कॉफीचे सेवन करू शकता. कॉफीचे सेवन केल्याने यूरिक अॅसिड नियंत्रणात राहते, असे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे. ज्या लोकांना यूरिक अॅसिड जास्त प्रमाणात आहे ते कॉफीचे सेवन करू शकतात.

Story img Loader