भारतात चहाप्रेमींची संख्या काही कमी नाही. अनेक लोक सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत केव्हाही चहा पिऊ शकतात. चहाच्या वेडापाई अनेकदा वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा चहा पिताना किंवा सर्व्ह करताना तो कपड्यांवर सांडतो. पांढऱ्या शर्ट किंवा इतर कपड्यांवर हे डाग जास्त गडद दिसतात. या कपड्यांवरील डाग कितीही वेळा धुतले तरी ते निघत नाही. यामुळे कपड्यांवरील चहाचे डाग घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
कपड्यांवरील चहाचे डाग कसे काढायचे?
कॉटन, शिफॉन आणि पॉलिस्टर कपड्यांवरील चहाचे डाग कसे स्वच्छ करायचे?
१) अशा प्रकारच्या कपड्यांवरील चहाचे डाग काढायचे असतील तर ते कोमट पाण्यात भिजवा.
२) कपड्यांवर चहा सांडल्यानंतर जितक्या लवकर तुम्ही ते स्वच्छ कराल तितके लवकर ते निघतील.
३) यानंतर चहाच्या डागांवर बेकिंग सोडा लावा आणि हाताने घासून घ्या.
४) आता काही वेळ असचं राहू दया.
५) यानंतर त्यात वॉशिंग पावडर टाका. टब आणि भिजवून सोडा.
६) आता डागभोवती हाताने घासून घ्या आणि नंतर पाण्याने धुवा आणि उन्हात वाळवा.
Remedies To Grow Eyebrows : आयब्रोज खूप पातळ वाटताहेत? मग रोज रात्री ‘या’ घरगुती तेलाने करा मसाज
लोकर आणि रेशमी कपड्यांवरील चहाचे डाग कसे घालवाल?
१) अशा कपड्यांवरील चहाचे डाग सहजपणे निघतात.
२) यासाठी एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर टाकून भरा.
३) आता चहाच्या डागांवर ते स्प्रे करा आणि हाताने घासून घ्या.
४) आता काही वेळ पाण्यात भिजत राहू द्या.
५) आता ब्रशच्या मदतीने हलके चोळून घ्या.
६) आता ते पाण्याने स्वच्छ धुवून उन्हात वाळवा.
पांढऱ्या शर्टवरील चहाचे डाग कसे घालवाल?
पांढरा शर्टवरील चहाचे डाग हे सहसा निघत नाही. अशावेळी हे जिद्दी डाग काढण्यासाठी आपण अनेक आयडिया वापरतो. पण लिंबू आणि बेकिंग सोड्याने आपण हे डाग सहज काढू शकतो. यासाठी एका बाउलमध्ये लिंबू आणि बेकिंग सोडा टाकून त्याचे मिश्रण करा. त्यानंतर ब्रश किंवा पिळलेल्या लिंबाच्या सालीच्या मदतीने डागावर घासून घ्या आणि ते थोडावेळ असेच राहू द्या. आता तुम्ही ते स्वच्छ पाणी आणि वॉशिंग पावडरच्या मदतीने धुवा आणि शेवटी उन्हात वाळवा. तरीही हलका डाग दिसत असल्यास, ही प्रक्रिया पुन्हा करा. अशाप्रकारे तुम्ही पांढऱ्या शर्ट किंवा कपड्यांवरील चहाचे डाग सहज काढू शकता.