Shikshak Din 2023 History Significance in Marathi : शिक्षक दिन किंवा Teachers’ Day जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जागतिक पातळीवर शिक्षक दिन दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, पण भारतात मात्र शिक्षक दिन वेगळ्या दिवशी साजरा केला जातो. आपल्याकडे ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. शिक्षक दिन हा आपल्या जीवनातील शिक्षक आणि गुरुच्या स्थानी असलेल्या व्यक्तींना आदर देण्यासाठी साजरा करतात. त्यांच्यामुळे तुमच्या जीवनावर झालेला प्रभाव किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा समुदायासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कौतुक करण्याचा हा एक प्रसंग आहे. शाळांमध्ये सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून, डॉ. राधाकृष्णन यांचे स्मरण केले जाते आणि बरेच कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतात. जर तुम्ही शिक्षक दिन साजरा करत असाल, तर तुम्ही त्याचा इतिहास, महत्त्व आणि उत्सव याबद्दल जाणून घ्या.

शिक्षक दिन २०२३ कधी आहे?

भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. यंदा तो मंगळवारी असणार आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिवस म्हणून साजरी केली जाते. ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुट्टानी, तामिळनाडू येथे जन्मलेले डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते. ते एक विद्वान, तत्त्वज्ञ होते आणि त्यांना भारतरत्न पुरस्कारदेखील देण्यात आला होता. डॉ. राधाकृष्णन १९६२ मध्ये भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा काही विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. मात्र, डॉ. राधाकृष्णन यांनी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सांगितले. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

kaanchi re kaanchi re
कांची रे कांची गाण्यांवर सरांनी केला भन्नाट डान्स, “तुमच्या शाळेत डान्स करणारे शिक्षक होते का?” पाहा Viral Video
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
UPSC Preparation UPSC Mains Exam 2024 Overview of the question career
UPSC ची तयारी: UPSC मुख्य परीक्षा २०२४; प्रश्नाचे अवलोकन
west pune vs east pune dispute over progress
‘पूर्व’ आणि ‘पश्चिम’ पुण्याचा वाद जुनाच
Election campaign, Election campaign teachers,
निवडणूक प्रचारात सहभागी झाल्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कारवाई… काय आहे निर्णय?
Dev Uthani Ekadashi 2024
Dev Uthani Ekadashi 2024 Date: का साजरी केली जाते देवउठणी एकादशी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि महत्त्व…

हेही वाचा – Krishna Janmashtami 2023: जन्माष्टमीच्या दिवशी अशी करा भगवान श्री कृष्णाची पूजा

शिक्षक दिन हा समाजासाठी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करतो. ते आपल्या राष्ट्राचा कणा आहेत आणि तरुण पिढीला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतात. शिक्षक हा तो पाया आहे, ज्यावर तरुणांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. तुमच्या शिक्षकांचा तुमच्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेण्याची, त्यांनी तुम्हाला चांगले कार्य करण्यास आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी कशी प्रेरणा दिली याची आठवण करून देण्याची आणि त्यांच्या मेहनतीचा आदर करण्यासाठी शिक्षक दिन ही एक उत्तम संधी आहे.

हेही वाचा – Festivals in September 2023 : कृष्ण जन्माष्टमीपासून गणेश चतुर्थीपर्यंत; येथे पाहा सप्टेंबरमधील महत्त्वाच्या सण-उत्सवांची संपूर्ण यादी

कसा साजरा केला जातो शिक्षक दिन?

दरवर्षी शाळा सांस्कृतिक उत्सव आयोजित करून शिक्षक दिन साजरा करतात. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या शिक्षकांना चॉकलेट, फुले, भेटवस्तू, हाताने तयार केलेले कार्ड भेट देतात आणि भेटवस्तूंद्वारे त्यांचे स्नेह व्यक्त करतात. याव्यतिरिक्त, वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी भूमिका उलट करण्याचा एक प्रकार म्हणून शिक्षक म्हणून वर्गांमध्ये जाऊन शिकवतात. विद्यार्थी शिक्षक म्हणून काम करत असताना शिक्षक विश्रांती घेतात आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा आनंद घेतात. भूमिका बदलण्यामागे हेतू असा आहे की, विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या स्थानी जाऊन त्यांची भूमिका समजून घेता येते.