Teachers’ Day 2024 Gift Ideas: एखादं मातीचं भांडं जसा कुंभार घडवतो, अगदी त्याचप्रमाणे एक शिक्षक त्या प्रत्येक विद्यार्थांना घडवत असतो. अभ्यासाची ओढ, संस्कार, आदर यांची भावना त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात उमटवत असतो; त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नात्याला विशेष महत्त्व आहे. हे नातं भीतीयुक्त पण तितकेच आदरार्थीसुद्धा असते. तर आज या शिक्षकांचे कौतुक करण्याचा दिवस आहे. दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन (Teachers’ Day ) साजरा केला जातो. हा दिवस देशासाठी विशेष आहे, कारण हा दिवस भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. शिक्षक दिन ( Teachers’ Day ) हा खास दिवस साजरा करण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देतात, त्यांचे स्टेटस ठेवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, जर तुम्हाला तुमच्या शिक्षकाला (Teachers’ Day) एखादे खास गिफ्ट (भेटवस्तू) देण्याची इच्छा असेल तर तुम्ही पुढील काही पर्यायांचा विचार करू शकता…

स्टेशनरी : तुमच्या शिक्षकाचे नाव किंवा आद्याक्षरे असणारा स्टेशनरी वस्तूंचा एक सेट तयार करा आणि गिफ्ट म्हणून द्या. तुम्ही नोटपॅड्स, स्टिकी नोट्स, लिफाफे डिझाइन करू शकता. या गिफ्टला आणखीन खास करण्यासाठी नोटपॅडवर तुम्ही शिक्षकांचे कौतुक लिहू शकता.

हाताने बनवलेल्या मेणबत्त्या : घरगुती मेणबत्त्या तयार करा. मेणबत्त्या तयार करण्यासाठी शिक्षिकेच्या आवडीचा सुगंध व रंग निवडा, म्हणजे ते शाळेत व घरी त्यांचा उपयोग करू शकतील. याचबरोबर तुम्ही एक धन्यवाद कार्ड लिहून बॉक्समध्ये ते गुंडाळून देवू शकता.

हेही वाचा…Ganesh Chaturthi Decoration Ideas: मोजकं सामान वापरून करा बाप्पासाठी ‘असं’ खास डेकोरेशन; ऐनवेळी झटपट सजावट करण्यासाठी स्वस्तात मस्त पाच टिप्स

कस्टमाइज बुकमार्क : प्रेरणादायी कोट्स किंवा संदेशांसह घरच्या घरी बुकमार्क डिझाइन करा. तुम्ही कार्डस्टॉक, डेकोरेटिव्ह पेपर, कार्ड पेपर वापरू शकता. या बुकमार्कवर तुम्ही रेखाचित्रे, फोटोदेखील जोडू शकता. बुकमार्क ही एक अशी भेट आहे, जी तुमच्या शिक्षकांना प्रत्येक वेळी एखादे पुस्तक वाचताना तुमची आठवण करून देईल.

मेमरी जार : शिक्षकांच्या कौतुकाच्या नोट्स लिहून एक जार भरा. प्रत्येक नोटमध्ये वैयक्तिक संदेश किंवा वर्गातील एखादा अविस्मरणीय क्षण नक्की लिहा आणि त्याला स्टिकर्ससुद्धा लावा; जेणेकरून ते दिसायला आकर्षक दिसतील.

DIY फोटो फ्रेम : घरी उपलब्ध असणाऱ्या सजावटीच्या वस्तूंसह फोटो फ्रेम तयार करा. वर्गातील इव्हेंटचा एक अविस्मरणीय क्षण, शिक्षकांचा फोटो, विद्यार्थ्यांबरोबरचा ग्रुप फोटो आदी अनेक फोटो तुम्ही फ्रेम करून देऊ शकता.

तर अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी खास, आकर्षक भेटवस्तू बनवून शिक्षकांना देऊ शकता…

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers day 2024 gift ideas 5 diy thoughtful ideas to make your teacher feel special read this five tips and tricks asp