टेक्नो या जागतिक प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने त्यांची लोकप्रिय कॅमेरा-केंद्रित कॅमॉन सिरीजमधील दोन नवीन उत्पादने टेक्नो कॅमॉन १७ प्रो आणि टेक्नो कॅमॉन १७ ची घोषणा केली आहे. कॅमॉन सिरीजमधील स्मार्टफोन्सला चांगले कॅमेरा पिक्सल्स, टीएआयव्हीओएस तंत्रज्ञानाने समर्थित अल्ट्रा नाइट लेन्स, पॉप-अप सेल्फी कॅमेरा, ऑटो आय फोकस अशा अनेक फीचर्समुळे ओळखले जातात. आता कॅमॉन १७ ने सेल्फी व व्हिडिओग्राफीसाठी अपडेट केले आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये मूव्ही मास्टर, ४के ३० एफपीएस क्लियर रेकॉर्डिंग, पोर्ट्रेट नाईट सीन व्हिडिओ आणि एआय स्मार्ट सेल्फीज सारख्या विविध प्रो-ग्रेड व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी मोडस आहेत.
काय आहे कॅमॉन १७ प्रोचे स्पेसिफिकेशन?
८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज
५००० एमएएचसह ३३ वॅट
किंमत १६,९९९ रुपये
६४ मेगापिक्सल क्वॉड रेअर कॅमेरा + ४८ मेगापिक्सल डॉट-इन सेल्फी कॅमेरा
रंग- आर्कटिक डाउन (Arctic Down)
काय आहेत कॅमॉन १७ चे स्पेसिफिकेशन?
६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज
५००० एमएएचसह १८ वॅट
१२,९९९ रूपये
६४ मेगापिक्सल एआय क्वॉड रिअर कॅमेरा + १६ मेगापिक्सल डॉट-इन कॅमेरा
रंग – फ्रॉस्ट सिल्वर, स्प्रूस ग्रीन आणि मॅग्नेट ब्लॅक
टेक्नो कॅमॉन १७ सिरीजची ही आहेत वैशिष्ट्ये!
१.व्यापक स्टोरेज क्षमता
२.प्रिमिअम स्लीक डिझाइन
३.उच्च क्षमतेची ५००० एमएएच बॅटरी
४.अत्यंत गतीशील मीडियाटेक हेलिओ जी९५ प्रोसेसर
५.अल्ट्रा प्रो व्हिडिओ कॅमेरा
ही आहे मर्यादित ऑफर
कॅमॉन १७ प्रोचे स्पेसिफिकेशन या स्मार्टफोनसोबत १,९९९ रूपये किंमतीचे बड्स मोफत. तसेच एचडीएफसी डेबिट व क्रेडिट कार्ड्सवर १० टक्के त्वरित सूट आणि ईएमआय सुविधा. कॅमॉन १७ या स्मार्टफोनला एचडीएफसी डेबिट/क्रेडिट कार्ड्सवर १० टक्के त्वरित सूट आणि ईएमआय सुविधा.
ट्रान्सशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजित तालपट्रा म्हणाले की, “नवीन-युगातील ग्राहकांच्या गरज लक्षात ही सिरीज घेऊन तयार केली गेली आहे. मोठी स्क्रीन आणि एक शक्तिशाली प्रोसेसरसह प्रो-ग्रेड स्मार्टफोन व्हिडीओग्राफी आणि छायाचित्रण क्षमता यामध्ये आहे.”