Ayurvedic Remedies To Yellow Teeth : पिवळे दात केवळ तुमच्या सौंदर्यातच अडथळा निर्माण करीत नाहीत, तर ते दात, हिरड्यांशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांनाही आमंत्रण देऊ शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि तोंडाची स्वच्छता न ठेवल्यामुळे दातांवर पिवळी घाण साचते. तसेच पिवळे दात व दुर्गंधी यांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतोच; पण इतरांशी संवाद साधताना अस्वस्थता आणि लाजिरवाणेदेखील वाटू शकते. तर, या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेकदा टूथपेस्ट बदलून पाहतो. तेव्हा असे न करता तुम्ही पुढील आयुर्वेदिक उपाय करून दररोज दात घासू शकता (Teeth Whitening Tips).

१. कडुलिंबाची टूथपेस्ट

आयुर्वेदात दातांसाठी कडुलिंब अत्यंत गुणकारी मानला जातो. कारण- त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुणधर्म असतात. अशा परिस्थितीत टूथपिकने किंवा पानांच्या पेस्टने दात घासल्याने पिवळ्या दातांची समस्या तर कमी होईलच (Teeth Whitening Tips); पण दुर्गंधीही दूर होईल.

२. लवंग चावून खा

त्याव्यतिरिक्त लवंगदेखील आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी उपाय ठरू शकतो. पिवळे दात आणि तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी लवंगाचे अँटीबॅक्टिरियल आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म प्रभावी ठरू शकतात. या समस्येमध्ये लवंग चघळणे किंवा पाण्यात लवंगाचे तेल टाकून गार्गल करा. या उपायाने आठवडाभरात तुम्हाला फरक जाणवू शकतो.

हेही वाचा…Shalini Passi : शालिनी पासीने सांगितला झोपेसाठी रामबाण उपाय; फक्त कोमट पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून प्या; वाचा डॉक्टरांचे मत

३. हळद आणि खोबरेल तेल

हळद आणि खोबरेल तेलचा उपायही तुमचे पिवळे दात पांढरे करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. ही तुमच्यासाठी एक प्रभावी आयुर्वेदिक टूथपेस्ट आहे. तुम्हाला फक्त अर्धा चमचा हळद, एक चमचा खोबरेल तेलात मिसळून, दातांवर पाच मिनिटे घासायची आहे. नंतर थुंकून कोमट पाण्याने तोंड धुवा. त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आरामही मिळेल.

४. पुदिन्याच्या पाण्याने दात स्वच्छ करा

पुदिन्याची ताजी पाने चावा किंवा पाण्यात थोडेसे पुदिन्याचे तेल मिसळून, दात स्वच्छ धुवा. त्यामुळे तुमचे दात आणि तोंड दोन्ही स्वच्छ होऊन ताजेतवानेपणाचा अनुभव मिळेल. हा उपाय तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी आहे.

५. रॉक सॉल्टने दात घासा

एक चमचा मोहरीच्या तेलात अर्धा चमचा म्हणजेच सैंधव मीठ मिसळून, ते दातांवर चोळा. त्यामुळे पिवळे दात पांढरे होतील आणि तोंडाची दुर्गंधीही दूर होईल. रॉक सॉल्ट आणि मोहरीचे तेल हे आयुर्वेदिक मिश्रण आहे; जे दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

Story img Loader