टेलिग्रामने त्यांच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी एक नवीन अपडेट सादर केल आहे. या नवीन अपडेटमध्ये वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स दाखल करण्यात आले आहे. टेलिग्रामने अपडेट केलेल्या फीचर्सपैकी एक खास फीचर्स म्हणजे आता ग्रुप व्हिडीओ कॉलद्वारे एक हजार (१०००) युजर्स एकाच वेळी जोडले जाऊ शकतात. याशिवाय, आता टेलिग्रामवरील वापरकर्ते आता स्नॅपचॅट प्रमाणे व्हिडीओ मेसेजदेखील चांगल्या क्वालिटीने रेकॉर्ड करू शकता. तसेच रेग्युलर व्हिडीओ हे तुम्ही ०.५ किंवा २x वेगाने पाहू शकतात.
व्हिडीओ कॉलमध्ये १००० व्यक्ती होऊ शकतात सहभागी
यात आणखीन एक फीचर्स आहे ते म्हणजे व्हिडीओ कॉलसाठी चांगल्या प्रकारच्या आवाजाबरोबर (साऊंड) मोबाईल शेअरींग करण्याचे ऑप्शन देण्यात आले आहे. यात तुम्ही व्हिडीओ कॉल केल्यावर त्यात १००० व्यक्ती सहभागी होऊ शकतात. तर यात स्क्रीनसह ३० व्यक्तींपर्यंत ब्रॉडकास्ट करून प्रसारित देखील करू शकता. तसेच व्हिडीओ स्ट्रीमिंगद्वारे पाहू शकतात. दरम्यान ई- लर्निंग व ऑनलाइन संवाद सोपा करण्यात यावा या हेतूने हे फीचर्स अपडेट करण्यात आले आहे. ग्रुप व्हिडीओ कॉल करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम ग्रुपच्या इन्फो पेजवर एक वॉइस चॅट तयार करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता. टेलिग्राम या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मद्वारे युजर्स व्हिडीओ, फोटो, इतर काही डॉक्युमेंट या द्वारे समोरील व्यक्तीला पाठवू शकता.
टेलिग्राम मध्ये उपलब्ध आहेत या सुविधा
टेलिग्रामने अलीकडेच वापरकर्त्यांसाठी काही विशेष फीचर्स यात समाविष्ट केले आहेत. ज्यामुळे युजर्स टेलिग्रामकडे जास्त आकर्षित होत आहे. या फीचर्समध्ये व्हिडीओ तयार करून पाठवणे एखादा मेसेज पाठवणे तसेच टेलिग्रामवर चॅटिंग करताना युजर्स लहान व्हिडीओ तयार करून देखील पाठवू शकतात.
टेलिग्राम वापरकर्त्यांना त्यांच्याद्वारे पाठवलेले टेक्स्ट मेसेजला एडिट करण्याची सुविधा देखील या फीचर्स मध्ये देण्यात आलीय. याचबरोबर वापरकर्त्याला टेलिग्राममध्ये एकापेक्षा जास्त प्रोफाइल पिक्चर सेट करण्याचा पर्याय देखील दिला गेलाय.