जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे नेहमीच आपल्या हटके कृत्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटरला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण दोघांमधील विक्रीचा करार फिस्कटला आणि प्रकरण थेट न्यायालयात गेले. एलॉन यांनी रशिया युक्रेन युद्धावर शांततेचा मार्ग देखिल सुचवला होता. त्यांनी ट्विट करून मार्ग सूचवला होता, ज्यावर चांगलीच चर्चा रंगली. कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असलेले मस्क आता फिटनेसमुळे चर्चेत आले आहे. एलॉन यांनी आपल्या फिटनेसविषयी खुलासा केला आहे.

विगोवी आणि उपवास हे आपल्या निरोगी आयुष्याचे रहस्य असल्याचे मस्क यांनी सांगितले. मस्क हे ५१ वर्षांचे आहेत. मात्र या वयात देखिल ते तरुण वाटतात. अनेकांना त्यांच्या फिटनेसबाबत कुतूहल वाटते. या कुतूहलापोटी @EvasTeslaSPlaid नावाच्या ट्विटर युजरने मस्क यांना त्यांच्या फिटनेसविषयी विचारले. तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त दिसता, या मगचे रहस्य काय असा प्रश्न या यूजरने केला होता. त्यावर मस्क यांनी आपण उपवास करत असल्याचे म्हटले. त्याचबरोबर त्यांनी एका औषधीचाही उल्लेख केला. विगोवी असे या औषधीचे नाव आहे.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
prajakta mali marathi actress reveals her weight
प्राजक्ता माळीचं वजन किती? भलंमोठं कॅप्शन लिहित केला खुलासा; म्हणाली, “लोक म्हणू लागलेत एवढी बारीक…”
Bobby Deol
‘जमाल कुडू’ची व्हायरल झालेल्या डान्स स्टेपमागची प्रेरणा काय? बॉबी देओल खुलासा करत म्हणाला, “मी लहान असताना…”

(आत्मविश्वासाने देऊ शकाल भाषण, केवळ ‘हे’ उपाय करा, टाळ्यांचा होईल कडकडाट)

काय आहे वेगोवी?

अमेरिकेच्या फुड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने गेल्या वर्षी विगोवी या औषधीला वजन कमी करण्याची औषध म्हणून मान्यता दिली होती. या औषधीचा वापर मधुमेहाच्या उपचारासाठी होते, मात्र आती ती वजन कमी करण्याची औषध म्हणून लोकप्रिय होत आहे.

विगोवी ही औषध डेन्मार्क येथील औषध निर्मिती कंपनी नोवो नोरडिस्कच्या सेमाग्लूटाईड या औषधीचे अपडेटेड व्हर्जन आहे, जे शरिरात भूक निर्माण करणाऱ्या संप्रेरकांना नियंत्रित करते आणि पाचनक्रिया मंदावते, त्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. वजन अधिक असलेल्या व्यक्तीला आठवड्यातून एकदा ही औषध दिली जाते. ही औषधी ६८ आठवड्यांमध्ये १५ ते २० टक्के वजन कमी करते असे एका अहवालात सांगण्यात आले होते.

(उच्च कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतात हृदयाचे विकार, कमी करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश)

केवळ हे लोकच करू शकतात वापर

विगोवी केवळ अशा लोकांना दिली जाते जे खूप लठ्ठ आहेत आणि ज्यांचे वजन लठ्ठपणाच्या निर्धारित मानकांपेक्षा अधिक आहे. तसेच ती टाईप २ मधुमेह आणि उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांना दिली जाते. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आणि निर्देशानुसार या औषधीचा वापर केला जाऊ शकतो.
अमेरिकेचे संकेतस्थळ व्हेराईटीनुसार, अनेक सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी या औषधीचा वापर करत आहे, ज्यामुळे तिचा तुटवडा देखील जाणवत आहे.

या औषधीच्या मासिक डोसचा खर्च ९८ हजार रुपये सांगितली जातो. वजन कमी करण्यासाठी या औषधीचा वापर करताना एफडीए कमी कॅलरी असणारे पदार्थ खाण्यासह व्यायाम करण्याचा सल्ला देते. औषधीचे सेवन केल्यानंतर रुग्णाला उल्टी किंवा डायरिया सारखे साइड इफेक्ट्स होतात, जे काही काळानंतर बरे होतात.

Story img Loader