अनेकजण वॉश बेसिंगध्ये हात धुतल्यानंतर ते हँड ड्रायरने कोरडे करतात. पण हँड ड्रायरने हात कोरडे करणाऱ्यांना आरोग्य तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. हात धुतल्यानंतर अनेकांना वाटते ते बॅक्टेरियामुक्त झाले, पण जेव्हा तेच हात कोरडे करण्यासाठी तुम्ही हँड ड्रायरखाली धरता तेव्हा हातांवर पुन्हा बॅक्टेरिया जमा होतात. यामुळे हँड ड्रायर मशीनमुळे संसर्ग वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पण हँड ड्रायरने संसर्ग कसा वाढतो हे जाणून घेऊ…
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार , लाखो बॅक्टरिया आपल्या आजूबाजूच्या वातावरणात आणि हवेत फिरत असतात. हेच बॅक्टेरिया हँड ड्रायरमध्ये जमा होतात आणि तुम्ही मशीन सुरु करताच तुमच्या हातावर येतात. हातावरील ओलाव्यामुळे ते त्वचेला चिकटून राहतात. सार्वजनिक स्वच्छता गृहांमध्ये ई – कोलाय, हिपॅटायटीस आणि फिकल बॅक्टेरियांची संख्या मोठ्याप्रमाणात असते हे मागील संशोधनातून समोर आले आहे.
प्रसिद्ध टिकटॉक सायन्स चॅनेल द लॅब लाइफने एका प्रयोगाद्वारे स्पष्ट केले की, हँड ड्रायर स्वच्छ हातांना संक्रमित करत आहे. बाथरूममध्ये असलेले बॅक्टेरियल एरोसोल (हवेत असलेले बॅक्टेरिया) हँड ड्रायरच्या माध्यमातून हातांवर ढकलले जातात. ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतोय.
याच विषयावरील एका मागील संशोधनात असे नमूद करण्यात आले की, इन्फ्लूएंझा, स्ट्रेप्टोकोकस, साल्मोनेला, शिगेला आणि नोरोव्हायरस सार्वजनिक शौचालयांमध्ये आढळून आले आहेत. तर २०११५ मध्ये झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, शौचालयात ७७००० प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया आढळून येतात.
रिसर्च रिपोर्ट्सनुसार, हे बॅक्टेरिया टॉयलेट फ्लश केल्यानंतर वॉशरूममध्ये पसरतात. नंतर ते हवेमार्फत संपूर्ण वॉशरूममध्ये पसरले जातात. तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक वॉशरूममध्ये अशी परिस्थिती टाळण्यासाठी हँड ड्रायरऐवजी पेपर टॉवेल वापरा.
वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीच्या २०१५ च्या अभ्यासात जेट एअर ड्रायर आणि पेपर टॉवेल्स यांच्यात एक तुलना करण्यात आली होती. जेट एअर ड्रायरमध्ये यीस्टच्या ५९ कॉलोनिया आढळून आल्याचे संशोधनात समोर आले आहे, तर पेपर टॉवेलमध्ये ही संख्या केवळ ६.५ आहे. जोरदार हवेमुळे बॅक्टेरिया मानवी चेहऱ्यापर्यंत पोहोचतात. याचा मुलांना धोका आणखी वाढतो. अशा परिस्थितीत ड्रायरपेक्षा पेपर टॉवेल हा अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो. म्हणूनच विशेषत: जर तुम्ही सार्वजनिक शौचालयाया वापर करणार असाल तर तेव्हा तुम्ही पेपर टॉयलेट वापरू शकता.