शरीरातील प्युरिन नावाच्या प्रथिनांच्या विघटनाने युरिक ऍसिड तयार होते. अशा स्थितीत शरीरात युरिक अॅसिड वाढू नये म्हणून आपण त्या पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे, ज्यामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. मशरूम आणि कोबीमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे युरिक अॅसिड वाढल्यावर कोबी आणि मशरूम न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याशिवाय राजमा, मटार, पालक, डाळ, दूध आणि दही यांचे सेवन टाळावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या लोकांच्या शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांनीही साखरेचे सेवन टाळावे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक फ्रुक्टोज जास्त प्रमाणात खातात त्यांना गाउट होण्याची शक्यता जास्त असते. एवढेच नाही तर तुम्ही मांस, सीफूड आणि अल्कोहोल यासारख्या गोष्टींचे सेवन टाळले पाहिजे कारण त्यात प्युरीनचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे शरीरात यूरिक अॅसिडचा धोका वाढतो.

( हे ही वाचा: तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका; वेळीच बदला नाही तर उद्भवू शकते मोठी समस्या)

युरिक ऍसिड वाढल्यास समस्या उद्भवतात

शरीरात यूरिक ऍसिडची उच्च पातळी धोकादायक असू शकते, ज्याला हायपरयुरिसेमिया म्हणतात. यूरिक ऍसिडच्या वाढत्या प्रमाणामुळे लोकांना गाउट आणि संधिरोग होण्याची शक्यता असते. यामुळे सांधेदुखी, हात आणि पायाची बोटे दुखणे, घोटा आणि गुडघ्यांमध्ये समस्या किंवा सूज येऊ शकते. एवढेच नाही तर युरिक अॅसिड असलेल्या रुग्णांना किडनी फेल्युअर आणि कमकुवत हृदय यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

आपल्या शरीरात युरिक ऍसिडची थोडीशी मात्रा आधीपासून असते. जी ३.५ ते ७.२ मिलिग्रॅम प्रति dL दरम्यान असते. मात्र यापेक्षा जास्त प्रमाणात युरिक अॅसिड असेल तर त्याला जास्त यूरिक अॅसिडची समस्या म्हणतात. शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने इतर अवयवांवर परिणाम होतो. यामुळे सांधेदुखी, शरीरात सूज येणे, किडनीचे आजार, लठ्ठपणा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. जास्त प्रमाणात यूरिक ऍसिडमुळे उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि मधुमेह यांसारखे धोकादायक आजार होण्याचा धोकाही वाढतो.

( हे ही वाचा: लैंगिक संबंध ठरतंय गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण? दरवर्षी ६७ हजार महिलांचा होतो मृत्यू, अशाप्रकारे घ्या काळजी)

यूरिक ऍसिड कमी करण्याचे मार्ग

  • ब्लॅक चेरीचा रस प्यायल्याने युरिक अॅसिड कमी होते. गाउट किंवा किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हा एक अतिशय फायदेशीर उपाय आहे. ब्लॅक चेरीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतात.
  • यूरिक ऍसिड नियंत्रित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शक्य तितके पाणी पिणे. पाणी यूरिक अॅसिड पातळ करते आणि यूरिक अॅसिड लघवीद्वारे शरीराबाहेर जाते.
  • ऍपल सायडर व्हिनेगर शरीरातून यूरिक ऍसिड कमी करण्यास मदत करते. अँटिऑक्सिडेंट आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे ते शरीरात ऍसिड-अल्कलाइन संतुलन राखते. व्हिनेगर रक्ताची पीएच पातळी वाढवून यूरिक ऍसिड कमी करण्यास मदत करते.
  • ऑलिव्ह ऑइलपासून बनवलेले अन्न शरीरासाठी फायदेशीर असते. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई आहे, जे यूरिक ऍसिड कमी करते.
  • सोयाबीन आणि टोफू सारखे पदार्थ खाल्ल्याने देखील युरिक ऍसिड कमी होते.