मासिक पाळी म्हणजे स्त्रीचा मासिक रक्तप्रवाह. स्त्रीच्या मासिक पाळीच्या रक्ताचा रंगावरून तिच्या आरोग्याची स्थिती कळते. स्त्रीच्या मासिक पाळीच्या रक्ताचा रंग अनेक मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते. त्यामुळे वेळीच हे ओळखून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या रक्ताचा रंग हार्मोनल बदलांमुळे, तसेच आहार, जीवनशैली, वय आणि वातावरण यामुळे बदलू शकतो. गर्भधारणा, संसर्ग गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर प्रकरणांमध्ये असामान्य रक्त रंग किंवा अनियमित रक्त प्रवाह कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला देखील मासिक रक्ताच्या रंगात आधीपेक्षा फरक जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्हाला गंभीर समस्येचा सामना करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया मासिक पाळीच्या रक्ताच्या रंगावरून तुम्ही तुमच्या आरोग्याचे मूल्यांकन कसे करू शकता.
मासिक पाळीच्या रक्ताच्या रंगावरून कसे ओळखावे
तेजस्वी लाल
उजळ लाल आणि गडद लाल रक्त दोन्ही चांगल्या मासिक पाळीची लक्षणे आहेत. जेव्हा रक्त चमकदार लाल असते, याचा अर्थ असा होतो की ते ताजे आहे. तुमच्या मासिक पाळीच्या सुरुवातीला जेव्हा रक्त प्रवाह जास्त असतो तेव्हा हे अधिक सामान्य असते.
(हे ही वाचा: मासिक पाळी लवकर येण्यासाठी ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब करा; नक्कीच फायदा मिळेल)
काळा रंग
मासिक पाळी दरम्यान काही जणांचे काळे रक्त येते. मासिक पाळी दरम्यान काळे रक्त म्हणजे या रक्ताला गर्भाशयातून बाहेर पडायला जास्त वेळ लागतो, ज्यामुळे ते अधिक ऑक्सिडाइज्ड होते. ज्या स्त्रियांना क्वचित मासिक पाळी येते त्यांच्यामध्ये हे सामान्य असू शकते.
पाहा व्हिडीओ –
गडद लाल आणि तपकिरी
तुमच्या मासिक पाळीच्या सुरूवातीस किंवा शेवटी तपकिरी रक्त वाहणे सामान्य आहे आणि हे फक्त एक लक्षण आहे की स्त्राव झालेले रक्त जुने आहे.
गुलाबी रंग
गर्भाशयाच्या द्रवामध्ये रक्त मिसळल्यामुळे पाळीच्या रक्ताचा रंग गुलाबी असू शकतो. तसंच हे कमी इस्ट्रोजेन पातळीचे लक्षण देखील असू शकते.
( हे ही वाचा: Swine Flu: करोनाच्या मध्येच आता स्वाईन फ्लूने वाढवली लोकांची चिंता; जाणून घ्या त्याची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधाच्या पद्धती)
नारिंगी रंग
मासिक पाळी दरम्यान नारिंगी रंगाचे रक्त असल्यास, हे लैंगिक संक्रमित संसर्ग (STI) किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होऊ शकते. या प्रकरणात असामान्य वास किंवा रक्ताच्या संरचनेत बदल देखील असू शकतात. या रंगाचे मासिक पाळीचे रक्त आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. त्यामुळे या स्थितीत वेळीच आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.