समाजात अनेकजण ठराविक गोष्टी चाकोरीबद्धपणे करताना आढळून येतात. काहीजण असतात जे वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत आपण अशा लोकांच्या संपर्कात येत नाही, तोपर्यंत एखादी गोष्ट करण्याचा अगदी सोपा अथवा अनोखा प्रकार आपल्या लक्षात येत नाही. आजच्या माहिती महाजालाच्या युगात हे सहज शक्य आहे. यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून मानवाला नवीन गोष्टी जाणून घ्यायला मिळत आहेत. महाजालावर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केलात अथवा निव्वळ फेरफटका जरी मारलात, तरी कल्पनाशक्तीला दाद द्याव्या, अशा असंख्य गोष्टी तुम्हाला सापडू शकतात. यूट्यूबवर फेरफटका मारत असताना आम्हाला फळे कापण्याची अनोखी पद्धत दर्शविणारे काही व्हिडिओ सापडले. सदर व्हिडिओ तुमच्यासाठी येथे शेअर करीत आहोत. या व्डिडिओमध्ये कडक नारळ फोडण्याची, किचकट डाळींब सोलण्याची आणि कलिंगड, अंबा, किवी आणि अननस कापण्याची सोपी आणि अनोखी पद्धत पाहायला मिळते.
पाहा : फळे कापण्याची अनोखी पद्धत
समाजात अनेकजण ठराविक गोष्टी चाकोरीबद्धपणे करताना आढळून येतात. काहीजण असतात जे वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात.
आणखी वाचा
First published on: 13-01-2015 at 04:01 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The easiest and fastest way to cut fruits