एखाद्या व्यक्तीसाठी तिचा आहार जितका महत्त्वाचा असतो तितकीच झोपही महत्त्वाची आहे. निरोगी आरोग्यासाठी शांत झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत दररोज सात तासांपेक्षा जास्त आणि १० तासांपेक्षा कमी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो आणि आपला थकवा निघून जातो. मात्र योग्य पद्धतीने झोपणेही गरजेचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक लोक रात्री झोपताना गडद अंधारात झोपणे पसंत करतात. तर काही लोकांना रात्री झोपताना प्रकाश असलेल्या खोलीत झोपतात. हा प्रत्येकाच्या सवयीचा भाग आहे. मात्र रात्री झोपताना खोलीत प्रकाश असणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. याचे अनेक दुष्परिणाम आहेत. एका नवीन अभ्यासानुसार रात्री झोपताना मंद प्रकाशात झोपणे हे जेष्ठ नागरिकांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा आजारांशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन इथे करण्यात आलेल्या या अभ्यासात झोपेदरम्यान खोलीत असलेल्या प्रकाशाचा संबंध आरोग्याच्या जोखमींशी अधिक असल्याचे ठळकपणे दिसून आला.

Photos : मुलींना आईकडून वारशामध्ये मिळते Anxiety; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

ऑक्सफर्ड अकॅडमिक स्लीपमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये ६३-८४ वयोगटातील ५५२ जेष्ठ नागरिकांचे विश्लेषण केले गेले, ज्यांनी सीव्हीडी (हृदय व रक्तवाहिन्याशी संबंधित) जोखीम घटक प्रोफाइल, क्रियाकलाप आणि हलक्या उपायांसाठी ७ दिवसांच्या अ‍ॅक्टिग्राफी रेकॉर्डिंगची तपासणी केली.

मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये कार्यरत डॉ अनिकेत मुळे यांच्यानुसार प्रकाशाच्या संपर्कामुळे शरीराच्या अंतर्गत झोपेच्या घड्याळात बदल होतो. तसेच झोपेचे प्रमाण आणि गुणवत्तेवर याचा परिणाम होतो.

जेव्हा खोली पूर्णपणे अंधारलेली असते, तेव्हा शरीर मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार करते जे स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगासह इतर अनेक रोगांशी लढण्यास मदत करते. खोली अंधारमय असल्यास तुम्हाला शांतपणे झोपणे देखील सोपे होते. हे केवळ लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करत नाही तर नैराश्य देखील कमी करते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The habit of sleeping in the light at night can be the cause of many diseases find out what the experts say pvp