कॉफी प्यायला सगळ्यांनाच आवडतं. कॉफी प्यायलावर शरीरातील आळस, सुस्ती निघून जाते. बरेचजण मूड फ्रेश करण्यासाठीही कॉफी आवर्जून पितात. कॉफी प्यायल्याने मधुमेहाचा धोका कमी संभवतो. कॉफी पिण्यामुळे आरोग्याला जसा फायदा होतो तसाच सौंदर्य उजळवण्यासाठीही कॉफी मोलाची कामगिरी बजावते. कॉफीचे तुमच्या शरीराला व आरोग्याला बरेच फायदे आहेत. पण जशी कॉफीची लोकप्रियता वाढली तेव्हा पासून भारतात केरळ कर्नाटक यासारख्या ठिकाणी देखील आता कॉफीचे उत्पादन घेतले जाते. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने ती वजन कमी करण्यासाठीदेखील फायदेशीर ठरते. काही आजारातही कॉफी गुणकारी ठरते. असे अनेक फायदे कॉफीचे आहेत. मात्र, कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्याने शरिराचे नुकसानही होते. त्यामुळे कॉफी प्रमाणात पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. चला तर मग जाणून घेऊयात कॉफीचे फायदे…
त्वचेचा कॅन्सर टाळण्यासाठी
कॉफीमध्ये असणाऱ्या विटामिन बी 3 मुळे कॉफी त्वचेच्या कर्करोगापासून तुम्हाला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर असते. एका रिसर्चमध्ये सिद्ध झाल्याप्रमाणे कॉफी पित असल्याने साधारण 20 टक्के पुरुष आणि 25 टक्के महिलांना गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका टळला आहे. ज्या महिला दिवसातून 3 कप कॉफी पितात त्यांना त्वचेच्या कर्करोगाची भीती राहात नाही असा दावा करण्यात आला आहे.
डोळ्याखाली काळी वर्तुळं
डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठीही कॉफीचा चांगला उपयोग होतो. कॉफी हे एक उत्तम स्क्रब आहे. त्यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे काळी वर्तुळं निघण्यास मदत होते. कॉफी हे चेहऱ्याला एक तजेलदारपणा आणून देते.
सूर्यकिरणांपासून करते बचाव
सूर्यकिरणांचा डायरेक्ट प्रभाव हा आपली त्वचा आणि मुळात चेहरा खराब करतो. पण कॉफीमधील अँटिऑक्सिडंट्स याच्याशी लढा देण्यास अधिक प्रभावी असतात. एका रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी याची मदत होते. तसंच कॉफी प्यायल्यानेदेखील तुम्हाला चेहऱ्यावरील डाग घालवण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
नियमित कॉफी प्यायल्याने शरीरात जमा झालेली चरबी विरघळण्यास मदत होते. ब्लॅक आणि ग्रीन कॉफी वजन कमी करण्यासाठी जास्त उपयुक्त ठरतात. ग्रीन कॉफी फॅट बर्न सप्लीमेंट म्हणून ओळखली जाते. ही तुम्ही नियमित प्यायल्यास, एका महिन्यात साधारण 10 ते 15 किलोपर्यंत वजन कमी होते. यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक तत्त्वांचा शरीराला फायदा होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नॉर्मल कॉफीच्या तुलनेत तुम्हाला ग्रीन कॉफीचा उपयोग अधिक होतो. यामुळे शरीराचे मेटाबॉलिजमदेखील सुधारते आणि शरीरावर अधिकची चरबी जमा होत नाही.
डोळ्यांचा थकवा दूर करते
कॉफीमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे डोळ्यांखाली आलेली सूज, सुरकुत्या कमी होण्यासाठी कॉफीचा उपयोग होतो. कॉफी पावडर, त्यामध्ये वाटलेले डार्क चॉकलेट आणि पाणी घालून पेस्ट करून घ्या आणि हे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला लावा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. 5-10 मिनिटं चेहऱ्याला हे लावून थंड पाण्याने धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात बदल दिसेल. डोळेही तजेलदार दिसतील.
(टीप : कोणत्याही उपचारापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)