Indian Railway: भारतीय रेल्वेकडून अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. आता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. रेल्वेतील खानपान सेवा सुधारण्यावर आता रेल्वे मंत्रालय भर देणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान लोकांना खाण्यापिण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी भारतीय रेल्वे आता ट्रेनमध्ये खाण्यापिण्याच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पावले उचलत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेमधील खाद्यपदार्थांचा मेनू बदलणार

रेल्वे मंत्रालयाने ट्रेनमधील खानपान सेवा सुधारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार आयआरसीटीसीकडून खाद्य यादी (मेनू) तयार केला जाईल, असा निर्णय रेल्वेने घेतला आहे. जेणेकरून प्रवाशांच्या आवडीनुसार स्थानिक खाद्यपदार्थ, हंगामी खाद्यपदार्थ, सण-उत्सवादरम्यान लागणारे खाद्यपदार्थ यांचा समावेश करता येईल. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या मागणीनुसार आयआरसीटीसी मधुमेहासारखे खाद्यपदार्थ अन्न, बेबी फूड, बाजरीवर आधारित स्थानिक उत्पादने यांसह आरोग्यदायी अन्नाचीही व्यवस्था करेल.

आणखी वाचा : नैराश्य-चिंता दूर करण्यासाठी ‘व्हिटॅमिन बी 6’ ठरतेय उपयुक्त? काय सांगतो संशोधन, पाहा एकदा रिपोर्ट!

जनता भोजनच्या मेनू आणि दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही

ज्या गाड्यांमध्ये कॅटरिंग शुल्क प्रवासी भाड्यात समाविष्ट केले जाते, तेथे मेनू आयआरसीटीसी द्वारे पूर्व-निश्चित दरामध्ये ठरवला जाईल. याशिवाय या प्रीपेड गाड्यांमध्ये अ-ला-कार्टे केटरिंग आणि ब्रँडेड खाद्यपदार्थांची कमाल किरकोळ किंमत विक्रीलाही परवानगी असेल. अशा अ-ला-कार्टे कॅटरिंगचे मेनू आणि दर आयआरसीटीसीद्वारे ठरवले जातील.यात जनता भोजनाच्या मेनू आणि दरात कोणताही बदल होणार नाही.

आयआरसीटीसी मेनू ठरवताना अन्न आणि सेवेची गुणवत्ता आणि मानके राखेल आणि प्रवाशांच्या तक्रारी टाळण्यासाठी प्रमाण आणि गुणवत्तेत घट, निकृष्ट ब्रँडचा वापर यासारखे वारंवार आणि अनुचित बदल टाळण्यासाठी सुरक्षा उपायांची खात्री करेल. मेनू दर त्यानुसार ठेवला जाईल. अंमलबजावणी करण्यापूर्वी मेनू प्रवाशांच्या माहितीसाठी सूचित केला जाईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The menu of food served in the train will change pdb
Show comments