भारतात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. चुकीची जीवनशैली आणि तेलकट पदार्थ खाण्यामुळे हृदयविकाराचा परिणाम तरुणांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु आता आपण वेळीच हा धोका ओळखू शकतो. शास्त्रज्ञांनी अशी एक पद्धत शोधून काढली आहे ज्यामुळे आपण जवळपास ३ वर्ष आधीच हृदयविकाराचा धोका ओळखू शकतो. ही महत्त्वपूर्ण चाचणी केल्याने हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका बर्‍याच अंशी कमी होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शास्त्रज्ञांनी हृदयविकाराच्या जुन्या रुग्णांच्या सी-रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटीनची चाचणी केली. यामुळे इंफ्लेमेशनचा शोध लावला जातो. यासोबतच ट्रोपोनिनची प्रमाणित चाचणीही करण्यात आली. ट्रोपोनिन हे एक विशेष प्रथिन आहे जे हृदयाला इजा झाल्यावर रक्तातून बाहेर पडते. अध्ययनानुसार, अडीच लाख रुग्णांमध्ये ज्यांची सीआरपी पातळी अधिक होती आणि जे ट्रोपोनन चाचणीत पॉझिटिव्ह आले होते, त्यांना मृत्यूचा धोका ३ वर्षांमध्ये सुमारे ३५ टक्के होता.

सतत लघवी होणे ठरू शकते ‘या’ आजाराचे कारण; लगेचच आहारात करा बदल

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर योग्य वेळी निरीक्षण केले गेले आणि अँटी-इन्फ्लेमेंटरी औषधांचे सेवन केले तर लाखो रुग्णांना वाचवता येऊ शकते. या संशोधनासाठी निधी देणारे, ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे प्रोफेसर जेम्स लीपर यांनी सांगितले, ‘डॉक्टरांच्या वैद्यकीय किटमध्ये समाविष्ट करणे हे एक मौल्यवान साधन आहे.’ एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दररोज सुमारे ४ तास स्वतःला सक्रिय ठेवल्याने हृदयविकाराचा धोका ४३ टक्क्यांनी कमी होतो.

हृदयविकाराची लक्षणे कशी ओळखावी?

अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने हृदयविकाराची अनेक लक्षणे सांगितली आहेत. यामध्ये, छातीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे ही सर्वात महत्वाची लक्षणे आहेत. अशक्तपणा, घसा, कंबर किंवा जबडा दुखणे हे देखील या गंभीर आजाराकडे निर्देश करतात. खांद्यामध्ये अस्वस्थता किंवा वेदना होत असल्यास सावध होण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The risk of heart attack can be identified only 3 years ago pvp