भारतातील अनेक शहरातील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. यामुळे लोक आजारी देखील पडू लागले आहेत. अशातच व्हायरल फिव्हर आणि जुलाबाची लागण झाल्याने डिहायड्रेशनच्या समस्या वाढू लागल्या आहेत. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे हे यामागचे एक कारण आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन खाण्यापिण्याची काळजी घ्या. लोकांना जुलाब आणि व्हायरल फिव्हर या दोन्ही लक्षणांची जाणीव असणे महत्त्वाचे आहे.
जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात व्हायरल फिव्हर आणि जुलाबाची चेतावणी चिन्हे दिसू लागतात तेव्हा जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आवश्यक चाचण्या करून घेणे सर्वात महत्वाचे आहे. जाणून घेऊया या आजारांची लक्षणे कशी ओळखावीत.
जुलाबाची लक्षणे :
- पोटदुखी
- मळमळ किंवा उलट्या
- पोटात जळजळ जाणवणे
- भूक न लागणे
- डोकेदुखी होणे
- ताप येणे
- सतत तहान लागणे
- विष्ठेतून रक्त येणे
- डिहायड्रेशनची समस्या
व्हायरल तापाची लक्षणे
- डोकेदुखीचा त्रास
- डोळे लाल होणे
- डोळ्यात जळजळ होणे
- घसा खवखवणे
- सर्दी होणे
- अंग दुखी
- शरीराचे तापमान वाढणे
- सांध्यांमध्ये वेदना जाणवणे
Photos : आर्थिक गुंतवणुकीसाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय; जाणून घ्या अधिक तपशील
अतिसार (जुलाब) आणि व्हायरल ताप कसा टाळायचा?
- डिहायड्रेशन टाळा
- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा
- दूषित पाण्याचे सेवन करू नका
- बदलत्या ऋतूमध्ये बाहेरच्या वस्तू खाणे टाळा
- कोमट पाणी प्या
- संतुलित आहार घ्या
- ताप असणाऱ्या रुग्णांच्या संपर्कात येणे टाळा.