वेगवेगळी फळे आणि भाज्या जशा आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत त्याचप्रमाणे काही फळांच्या आणि भाज्यांच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र अनेकदा लोकं या बिया टाकून देतात. तुम्ही देखील या बिया टाकून देत असाल, तर त्याआधी या बियांचा आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. असे मानले जाते की या बिया खूपच पौष्टिक असतात. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, फॅट्स, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडेंट्स उपलब्ध असतात. आज आपण जाणून घेऊया, अशा कोणकोणत्या बिया आहेत ज्यांचा आपण आपल्या आहारात समावेश करू शकतो.
भोपळ्याच्या बिया :
भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. असे मानले जाते की या बियांमध्ये फॅट्स आणि व्हिटॅमिन्सची मात्र अधिक असते. या बिया आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. भोपळ्याची बिया आपण कच्च्याही खाऊ शकतो. पण भाजून खाल्ल्यास त्या अधिक चविष्ट लागतात.
चमत्कारिक गाव… इथं अनेकांना आहे एकच किडनी; कारण वाचून बसेल धक्का
पपईच्या बिया :
पपईच्या बियाही खूप फायदेशीर आहेत. असे मानले जाते की पपईच्या बिया अनेक आजारांवर गुणकारी आहेत. या बियांमध्ये अनेक आजार आणि अति तणावाला रोखण्याची क्षमता असते. पपईच्या बियांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही पपईच्या बिया कच्च्या खाऊ शकता, पण ते खाताना थोडी काळजी घ्या, कारण त्यांना उग्र वास येतो.
चिंचेच्या बिया :
खूप कमी लोकांना माहित असेल की चिंचेच्या बियादेखील अनेक फायदे आहेत. असे मानले जाते की चिंचेच्या बिया फक्त आपल्या हृदयासाठीच फायदेशीर नाही तर आपल्या दातांसाठीही उपयुक्त आहेत. एवढेच नाही तर या बिया खाल्ल्याने इन्फेक्शन होण्याची शक्यताही कमी असते.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)