बरेच लोक निरोगी राहण्यासाठी ददरोज शतपावली करतात. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो, तसेच मांसपेशी आणि हाडे मजबूत होतात. सहसा, हे सर्व फायदे मिळविण्यासाठी लोक सरळ, म्हणजे पुढे, हळू किंवा वेगाने चालतात. परंतु तुम्ही कधी मागच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न केला आहे का? अर्थात, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की एखादी व्यक्ती उलट कसे चालू शकते आणि यामुळे शरीराला काय फायदा होऊ शकतो? परंतु उलट चालणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चालण्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, अनेक प्रकारचे कॅन्सर इत्यादीपासून आपला बचाव होऊ शकतो. लहानपणी आपण खेळताना अनेकदा उलट चाललो आहोत. परंतु, मागच्या दिशेने किंवा उलट चालण्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत, जे आपण आज जाणून घेणार आहोत.
सतत लघवी होणे ठरू शकते ‘या’ आजाराचे कारण; लगेचच आहारात करा बदल
उलट चालण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे :
- जेव्हा तुम्ही मागच्या दिशेने चालता किंवा उलट चालता तेव्हा तुमची गुडघेदुखी लवकर बरी होऊ शकते. उलट चालल्याने गुडघ्यांवर असलेला ताण कमी होतो. यामुळे सूज कमी होते.
- उलटे चालणे तुमच्या पायांना अधिक ताकद देते, कारण उलट चालताना अधिक शक्ती वापरावी लागते. त्यामुळे दोन्ही पायांच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूंचा व्यायाम होतो आणि त्यांना ताकद मिळते.
- कंबर किंवा पाठदुखी तुम्हाला त्रास देत असल्यास, उलट चालण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या भागांच्या स्नायूंमधील ताण दूर होतो. कंबर आणि मणक्याची हाडे मजबूत असतात. पाठदुखी निघून जाते. दररोज १० मिनिटे उलट चालण्याचा सराव करून पहा, शरीरातील अनेक वेदना निघून जातील.
- उलट चालल्यामुळे पायांमधील ज्या स्नायूंचा फारसा उपयोग होत नाही त्यांनाही ताकद मिळते. गुडघ्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा वेदना होत असल्यास ती बरी होते. तसेच यामुळे शारीरिक संतुलन निर्माण करण्यास मदत होते.
- शरीर अतिरिक्त कॅलरी जलद बर्न करते. वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. यासोबतच मेटाबॉलिझमलाही चालना मिळते.
- जेव्हा तुम्ही उलट चालता तेव्हा स्नायू आणि हाडांना ताकद मिळते आणि ते अधिक मजबूत होतात.
मासिक पाळीमध्ये पेनकिलरचे सेवन ठरू शकते धोकादायक; ‘या’ घरगुती उपचारांनी मिळेल आराम
- उलट चालल्याने शरीरासोबतच मानसिक आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदा होतो. जेव्हा तुम्ही मागे चालता तेव्हा वेगवेगळ्या स्नायूंना फायदा होतो. तुम्ही तुमच्या मनाला एकाग्र करता.
- शरीराबद्दल अधिक जागरूक असल्याची भावना येते.
- शारीरिक समन्वय आणि गती वाढते.
- वर्कआउट्समुळे होणारा कंटाळा प्रतिबंधित करते.
- एकूण मूड सुधारते.
- झोप सुधारते.
- तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडता.
- दृष्टी सुधारते.
- विचार करण्याची क्षमता वाढवते, संज्ञानात्मक नियंत्रण (cognitive control) वाढवते
(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)