Remedies to Get Rid of Rats: घरात उंदरांचा वावर नकोसा वाटतो. घरात जर एकही उंदीर शिरला तर डोकेदुखी होते. उंदीर अन्नधान्य तसंच कपडे सर्वच गोष्टी कुरतडून टाकतात. घरात सगळ्या गोष्टींची नासधूस करून टाकतात. उंदरांना घालवण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही ते जात नाहीत. अशा परिस्थितीत ही हानी टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करून तुम्ही उंदरांपासून मुक्ती मिळवू शकता. तर जाणून घ्या काही घरगुती उपाय की, ज्यामुळे तुम्ही उंदरांपासून सुटका मिळवू शकता.
पेपरमिंटचा वापर
पेपरमिंटच्या वासाने उंदीर पळून जातात. उंदरांना दूर ठेवण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पेपरमिंट घालून कापसाचा बोळा ठेवा याने उंदीर लगेच घर सोडून पळून जातील. तसंच पुन्हा त्यांचा वावर घरात दिसणार नाही. त्यामुळे पेपरमिंट उंदीर घालवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
( हे ही वाचा: घरात मुंग्यांचा वावर वाढलाय?; ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा)
तंबाखू
तंबाखू उपाय देखील उंदीर दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.यासाठी एका भांड्यात चिमूटभर तंबाखू घेऊन त्यात २ चमचे देशी तूप आणि बेसन घालून गोळ्या बनवा. या गोळ्या घराच्या त्या कोपऱ्यात ठेवा ज्या कोपऱ्यात वारंवार उंदरांचा वावर असतो. उंदीर त्यांना खातातच ते बेशुद्ध अवस्थेत घर सोडून बाहेर पडतात.
पुदिना
उंदरांना पुदिन्याचा वास आवडत नाही. उंदरांना घरापासून दूर ठेवण्यासाठी पुदिन्याची पाने घराच्या कानाकोपऱ्यात ठेवल्यास तुमच्या घरात उंदरांचा प्रवेश टाळता येईल. पुदिन्याचा वास खूप स्ट्राँग असतो. ज्याचा वास उंदरांना सहन न झाल्याने उंदीर नाहीशे होतात.
( हे ही वाचा: घरात झुरळांचा वावर जास्त झालाय ? या ५ टिप्स फॉलो करा)
तेजपत्ता
घरातील उंदीर हाकलण्यासाठी तेजपत्ता हा एक चांगला उपाय आहे. यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तमालपत्र ठेवा ज्याठिकाणी उंदरांचा वावर जास्त आहे. याच्या सुगंधाने उंदीर तुमच्या घरातून पळून जातील. तसंच पुन्हा त्यांचा त्रास तुम्हाला होणार नाही.