Coronavirus: जगभरात कोविडची प्रकरणे ज्या प्रकारे वाढत आहेत ते पाहता, WHO च्या कोविड तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी लोकांना भविष्यात कोविडच्या आणखी संसर्गजन्य प्रकारांबद्दल चेतावणी दिली आहे आणि लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Omicron BA.5 वर्चस्व

या वर्षाच्या सुरुवातीपासून, करोनाचा ओमिक्रॉन हा प्रकार वर्चस्व गाजवत आहे. BA.1, BA.2, BA.3, BA.4 आणि BA.5 सह ओमिक्रॉनचे विविध उप-प्रकार आता उघड झाले आहेत. ओमिक्रॉनचे उप-रूपे रोग प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी ओळखले जातात. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सामायिक केलेल्या डेटानुसार, ओमिक्रॉन विषाणू सध्या अनेक देशांमध्ये पसरला आहे. BA.5 हा १२१ देशांमध्ये प्रबळ आहे, तर BA.4 हा १०३ देशांमधील लोकांना संक्रमित करत आहे. डॉ. केरखॉव्ह म्हणाले की, Omicron BA.5 हे या क्षणी चिंतेचे कारण बनले आहे.

( हे ही वाचा: COVID Symptoms 2022: ताप, खोकला नाही तर ‘ही’ ३ विचित्र लक्षणे आता करोना रुग्णांमध्ये दिसत आहेत; वेळीच सावध व्हा)

करोनाची विस्तारित रूपे येतील

डब्ल्यूएचओ महामारीशास्त्रज्ञांनी भविष्यात आणखी संक्रमित व्हायरस प्रकारांचा इशारा दिला आहे. २०२० मध्ये जेव्हा साथीचा रोग सुरू झाल्यापासून, कोविड-19 चे अनेक वेळा उत्परिवर्तन झालेले दिसण्यात आले आहे. करोनाच्या सर्व प्रकारांपैकी डेल्टा आणि ओमिक्रॉन सर्वात जास्त पसरले आहेत. डेल्टा प्रकाराने २०२१ मध्ये भारतात कहर निर्माण केला होता. या प्रकाराने देशातील रुग्णालये खिळखिळी झाली होती. डॉ. कार्खोव्ह यांनी भविष्यात आणखी गंभीर प्रकार येण्याचा इशारा दिला आहे.

येणारे रूपे भविष्यात अधिक वेगाने पसरतील

Omicron या क्षणी सर्वात वेगाने वाढणारा प्रकार आहे. हा प्रकार डिसेंबर २०२१ मध्ये सापडला होता आणि तेव्हापासून तो प्रबळ प्रकार बनला आहे. या प्रकारामुळे होणारा संसर्ग जरी सौम्य दिसत असला तरी लोकांना झपाट्याने संक्रमित करण्याची क्षमता यामध्ये आहे. भविष्यात येणार्‍या नवीन प्रकारांबद्दल WHO सतत चेतावणी देत ​​आहे.

( हे ही वाचा: Weight Gain Foods: वजन झपाट्याने वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा; महिन्याभरात फरक जाणवेल)

भारतातील कोविडची स्थिती

सध्या देशात करोना विषाणूचे सक्रिय रुग्ण ९६,५०६ आहेत. त्यापैकी गेल्या २४ तासांत ९६८० लोक बरे सुद्धा झाले आहेत. सध्या रिकवरीचा दर ९८.५९% आहे. त्याच वेळी, गेल्या २४ तासांत ८५८६ नवीन प्रकरणे देखील नोंदवली गेली आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There may be more infectious forms of corona in the future know the warning given by who gps