Dark-Neck Cure: मान खाली घालून राहावं लागू नये यासाठी आपण सर्वपरीने प्रयत्न करतो पण त्याच मानेची काळजी मात्र अनेकदा गडबडीत घेतली जात नाही. अनेकदा खोटे दागिने घातल्याने किंवा अलीकडे तर ब्ल्यूटूथचा पट्टा सतत गळ्यात असल्यानेही मान काळवंडते. आंघोळ करताना मानेचा भाग हा दुर्लक्षित राहतो, आपणही विशेष वेळ काढून मान घासून साफ करत नाही, यामुळेच धूळ, घाम जमा होऊन मानेचा रंग काळा व्हायला सुरुवात होते. तसेच अनेकदा आपण डोक्याला तेल लावतो तेव्हा केस मोकळे सोडतो किंवा वेणी बांधतो तेव्हा हे तेल सुद्धा मानेला लागते पण नंतर स्वच्छ केले जात नाही. यामुळेच मान काळवंडते आणि वेळीच स्वच्छ न केल्यास हा थर आणखी गडद होऊ लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डार्क नेकसाठी जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन काही ट्रीटमेंट घ्यायचा विचार करत असाल तर आरामात ५००-६०० ची फोडणी बसणार हे नक्की, यापेक्षा तुमच्या घरातील काही भाज्या सुद्धा उत्तम स्क्रबिंग, क्लेनसिंग करू शकतात. अवघे ३० रुपये व काही मिनिट देऊन तुम्ही तुमच्या काळ्या मानेपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात काळ्या मानेची त्वचा कशी उजळवावी..

बटाटा (Potato Juice For Dark Neck)

मानेच्या त्वचेचा रंग उजळण्यासाठी बटाट्याहून कमाल पर्यायच नाही. बटाटा केवळ त्वचेचा टॅन काढत नाही तर त्वचेच्या अन्य समस्या सुद्धा दूर करू शकतात. यासाठी बटाटा किसून त्याचा रस एका वाटीत काढून घ्यावा. यात थोडा लिंबाचा रस टाकून मानेवर १० ते १५ मिनिट लावून ठेवा. यानंतर १५ मिनिटांनी मान थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढा. यामुळे त्वचेवरील बॅक्टेरिया व मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. लिंबाच्या रसामुळे मानेचा चिकटपणाही दूर व्हायला मदत होते.

लिंबू (Lemon Juice For Dark Neck)

साइट्रिक ऍसिड व विटामिन सी (vitamin c)चा साठा असणारा लिंबू हा त्वचेचे टॅन सूर करायला मदत करतो. लिंबाचा रस २० मिनिट मानेवर लावून ठेवावा व मग त्वचा धुवावी. जर तुमची त्वचा सेन्सेटिव्ह असेल तर लिंबाच्या रसात थोडं गुलाबजल टाकून कापसाच्या बोळ्याने मानेला लावा.

हे ही वाचा<< Cholesterol वाढल्यास पायात दिसून येतात ‘ही’ ३ मोठी लक्षणे; हातातही सतत जाणवतात वेदना

काकडी (Cucumber Removes Skin Darkness)

काकडीमध्ये थंडावा असतो यामुळे त्वचेचा काळपट थर निघून जाण्यास मदत होते. काकडी किसून त्यात हलका लिंबाचा रस किंवा दही लावून तुम्ही मानेला लावून ठेवू शकता. १० मिनिटांनी त्वचा थंड पाण्याने धुवून काढा. काकडी व दह्याने थंडीत त्वचेचा रुक्षपणाही कमी व्हायला मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These 3 best vegetable juice to get rid of dark neck know how to use it beauty tips at home svs