Blood Sugar: मधुमेह हा एक आजार आहे ज्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मधुमेहच्या रुग्णांनी आहार आणि डाइटवर नियंत्रण नाही ठेवले तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. तुम्हाला मधुमेह असल्यास , तुमच्या रक्तातील ग्लुकोजच्या उच्च पातळीमुळे तुम्हाला तुमच्या पायांमध्ये काही समस्या दिसू शकतात. या समस्यांवर वेळीच उपचार न केल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते. रक्तातील साखर वाढल्यावर रुग्णाच्या पायात काय समस्या येतात आणि त्या कशा नियंत्रित कराव्यात ते जाणून घेऊया.

मधुमेहाचा पायांवर कसा परिणाम होतो?

मधुमेहाच्या रूग्णांमध्ये शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असते किंवा काही प्रकारचे संक्रमण होते, ज्यामुळे त्यांच्या पायांमध्ये वेदना आणि अनेक समस्या उद्भवू शकतात. मधुमेह आटोक्यात न आल्यास मज्जातंतूंना हानी पोहोचते. मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे, आपल्याला पायांमध्ये थंड किंवा गरम भावना जाणवत नाही.

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Shocking Dance Video
असा जीवघेणा डान्स तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल, तरुण टॉवरच्या रेलिंगवर उभे राहिले अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

( हे ही वाचा: Heart attack First Aid: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल; वेळीच सावध व्हा)

मधुमेह वाढत असताना पायांच्या होणाऱ्या समस्या

ऍथलीट फुट असू शकतो

ऍथलीट फुटची समस्या असू शकते. ही एक बुरशी आहे ज्यामुळे खाज सुटणे, लालसरपणा आणि पायांमध्ये क्रॅक होतात. हे जंतू तुमच्या त्वचेच्या क्रॅकमधून आत प्रवेश करू शकतात आणि संसर्गास कारणीभूत ठरू शकतात. बुरशी नष्ट करणारी औषधे ऍथलीट फुटवर उपचार करू शकतात.

नखांना बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो

साखर वाढल्याने नखांना बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. बुरशीने संक्रमित नखे पिवळी, तपकिरी आणि खडबडीत असू शकतात जी तुमच्या उर्वरित नखांपेक्षा वेगळी असू शकतात. साखर वाढली तर तुमची नखेही उचलू शकतात. शूजचा अतिवापर केल्याने या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळते. तुमच्या नखाला दुखापत झाल्यास बुरशीजन्य संसर्ग देखील होऊ शकतो. बुरशीजन्य नेल इन्फेक्शनवर तुमच्या डॉक्टरांकडून ताबडतोब उपचार करा.

( हे ही वाचा: चालताना नेहमी पायांवर लक्ष ठेवा; ‘हे’ १ चिन्ह दिसल्यास समजून घ्या नसांमध्ये जमा होत आहे ‘Bad Cholesterol’)

पाय सुन्न होणे आणि सूज येणे

जसजसा मधुमेह वाढत जातो तसतसे पायांना सूज येऊ शकते आणि पाय सुन्न होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रभावित होते, ज्यामुळे पाय सुन्न होऊ शकतात. पायाला सतत सूज येत असेल तर समजून घ्या साखर वाढत आहे.

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी टिप्स

  • मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी.
  • आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा आणि कर्बोदकांचे सेवन कमी करा, साखर नियंत्रणात राहील.
  • मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीर सक्रिय ठेवा. रोज योगा आणि व्यायाम करा.
  • साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करा. तुळशीमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी होते.

Story img Loader