भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला अतिशय महत्व आहे. दिवाळी म्हटलं की, खाद्यांची जणू मेजवाणीच. या काळात विविध तऱ्हेचे गोड सुगंधित आणि चविष्ट पदार्थ आपल्या घरी बनविल्या जातात. खरतंर दिवाळी सप्ताहात चविष्ट पदार्थांच्या मोहात आपण पडतो. यादरम्यान, अलगत आपल्याला वजन वाढलेलं दिसतं. मग काय, पोटाचे विकार आणि वाढलेलं वजन याचीच सतत चिंता असते. मात्र, ही चिंता दूर करायची असेल तर ही पेय तुमच्यासाठी उपायकारक ठरू शकतात.
वजन का वाढते ?
हवामान बदललं की, त्याचा परिणाम शरिरावर होतोच. हिवाळा आला की खाण्याची संस्कृती पुढं येते. हिवाळयात प्रत्येकालाच काहीतरी चटक मटक खायला आवडते. या ऋतूत खाण्याच्या सवयी बदलतात. अन्नाची तीव्र इच्छा असते आणि भूक शांत करण्यासाठी लोक काहीतरी किंवा दुसरे खात राहतात. जास्त खाणे हे वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे, ज्यामुळे हिवाळ्यात लोकांचे वजन अधिक वाढते. या ऋतूमध्ये शरीराची क्रिया कमी होते, त्यामुळे कॅलरीजचा वापरही कमी होतो. जास्त कॅलरी आणि त्याचा कमी वापर हे लठ्ठपणा वाढवण्याचे कारण आहे.
‘हे’ पेय तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल
बीटाचा रस अधिक पूरक
हिवाळयात बीटचं सेवन आपल्या शरिरासाठी अधिक फायदेशीर असतं. हिवाळ्यात बीटरूटचा दर्जा चांगला असतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, नायट्रेट्स, बेटेन यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध हा रस भूक शांत करतो. त्याचबरोबर आपलं वजनही नियंत्रित करण्यास मदत करतो. बीट रूटमध्ये असलेले फायबर हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. त्यामुळं बीटचा ज्युस आपल्या आरोग्यासाठी अधिक पूरक असून वजन नियंत्रणासाठी आवश्यक आहे.
आणखी वाचा : Weight Loss : ‘या’ सवयी ठरतात वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा; लगेच करा बदल
डाळिंबाचा रस अधिक दमदार
हिवाळयात डाळिंबाचा रस आपल्या शरिरासाठी अधिक गुणकारी असते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल्स आणि संयुग्मित लिनोलेनिक अॅसिडने समृद्ध असतात. त्यामुळं डाळिंबाचा रस काढून सेवन केल्याने चरबी जाळण्यास मदत होते. हा रस चयापचय वाढवतो आणि दीर्घकाळ भूक नियंत्रित करतो.
ओवा अधिक असरदार
ओवा हा औषधी गुणधर्मांनी समृद्ध असा मसाला आहे. ओव्यामुळं शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ओव्यामध्ये पिनिन, जिरे, डाय पेंटीन, निकोटिनिक अॅसिड असते, जे शरीर निरोगी ठेवते आणि वजन कमी करते. हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारा ओवा, सर्दी यांसारख्या आजारांपासून संरक्षण करतो आणि वजनही नियंत्रणात ठेवतो. ओव्याचा रस पिल्याने जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.