Breakfast Ideas For Diabetes: मधुमेहाची समस्या असलेल्या रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या आजारात शरीराची प्रतिकारशक्ती खूपच कमी असते. त्यामुळे नवीन आजार होण्याचा धोकाही वाढतो. मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी. मधुमेह हा एक आजार आहे ज्यामध्ये स्वादुपिंड कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करते.
इन्सुलिन हा एक हार्मोन आहे जो अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो. मधुमेही रुग्णांनी अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा, जे त्यांच्या शरीरात नैसर्गिक इन्सुलिनचे काम करतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. चला जाणून घेऊया काही आरोग्यदायी पदार्थ जे शरीरात साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
( हे ही वाचा: युरिक अॅसिडच्या रुग्णांनी चुकूनही स्नॅक्समध्ये ‘हे’ ५ पदार्थ समाविष्ट करू नका; ते शरीरात विषासारखे काम करतात)
मधुमेहींनी नाश्त्यात ‘या’ गोष्टींचा समावेश करावा
हिरव्या पालेभाज्या
मधुमेहींनी आहारात हिरव्या भाज्यांचे अधिकाधिक सेवन करावे. यामध्ये तुम्ही पालक, मेथी, ब्रोकोली या भाज्या अधिकाधिक खाऊ शकता. या भाज्यांमध्ये कॅलरी कमी आणि पोषक तत्वे जास्त असतात. हिरव्या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. हिरव्या भाज्या हृदय आणि डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर असतात. व्हिटॅमिन सी हिरव्या भाज्यांमध्ये देखील आढळते, जे टाइप २ रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. हे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
अंडी
Healthline.com च्या महितीनुसार अंडी मधुमेहींसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, कारण अंडी ७० कॅलरीज आणि ६ ग्रॅम प्रथिने पुरवतात. त्यामुळे रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे अंडी हा प्रोटीनयुक्त आहार मानला जातो.
( हे ही वाचा: फुफ्फुसांची स्वच्छता आणि श्वसनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी सीताफळ खाणे ठरेल वरदान! जाणून घ्या याचे फायदे)
दलिया
दलियामध्ये उच्च फायबरसह कॅलरी आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. जे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकते.
एवोकॅडो
एवोकॅडो हे चवीला स्वादिष्ट असे तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे, कारण त्यात कॅलरी, प्रथिने, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि फायबर असतात, ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक चांगला आहार पर्याय बनतो.
( हे ही वाचा: हिवाळ्यात काही लोकांना जास्त थंडी का वाजते? जाणून घ्या यामागची गंभीर कारणे)
चीज
चीज आणि सर्व दुग्धजन्य पदार्थ मधुमेह असलेल्या लोकांसाठी एक चांगला पर्याय असू शकतात. कारण त्यात कार्बोहायड्रेट्स कमी असतात आणि प्रथिने आणि फायबर चांगले असतात जे इंसुलिनच्या वाढीस मदत करतात.