High Cholesterol Sign: अपुरा आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. कोलेस्टेरॉल हा एक स्निग्ध पदार्थ आहे जो शरीरातील पेशी निरोगी ठेवण्याचे काम करतो. आहारात जास्त मीठ आणि तेल जास्त खाल्ल्याने आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते.
कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराच्या झटक्यापासून ते उच्च रक्तदाब आणि मधुमेहापर्यंतच्या आजारांचा धोका वाढतो. उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्त परिसंचरण प्रभावित होते आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने शरीराला गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.
प्रसिद्ध योग तज्ञ आणि टीव्ही व्यक्तिमत्व हंसा योगेंद्र यांच्या मते, जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याने जास्त घाम येणे, थकवा, अशक्तपणा, भूक न लागणे यासारखे आजार खूप त्रासदायक असतात. जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा डोळ्यांच्या आत किंवा आजूबाजूच्या त्वचेवर पिवळे ठिपकेही दिसतात. शरीरातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे पदार्थ खा.
जर तुम्हाला कोलेस्टेरॉल नियंत्रित करायचं असेल तर आहारात अनसॅच्युरेटेड फॅटचा समावेश करा
जर कोलेस्टेरॉल जास्त राहिल्यास आहारात सॅच्युरेटेड फॅटऐवजी अनसॅच्युरेटेड फॅट्सचा समावेश करा. अनसॅच्युरेटेड फॅट्स मध्ये तुम्ही ऑलिव्ह ऑईल, सूर्यफूल तेल, फिश ऑइल, नट आणि बियांचे तेलांचा समावेश करू शकता.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी चांगल्या फॅटचे सेवन करा
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचं असेल तर उत्तम चरबीयुक्त पदार्थ खा. तुम्ही चांगल्या चरबीमध्ये नट खाऊ शकता, मासे खा, संपूर्ण धान्य, बिया आणि ऑलिव्ह ऑईलचे सेवन करा..
(हे ही वाचा: रात्रीच्या वेळी डाळ-भात खाल्ल्यास झपाट्याने वाढू शकते युरिक ॲसिड; कंट्रोल करायची ‘ही’ पद्धत एकदा जाणून घ्याच)
एवोकॅडोचे सेवन करा
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचं असेल तर एवोकॅडो खा. एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात आणि हृदय निरोगी ठेवतात.
मोड आलेले कडधान्य खा
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर मोड आलेले कडधान्य खा. स्प्राउट्समध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.
दररोज व्यायाम करा
दररोज व्यायाम करून तुम्ही कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करू शकता. दररोज १५-२० मिनिटे योगासने आणि व्यायाम शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी प्रभावी आहेत.