नवरा-बायकोमधील छोटी छोटी भांडणांमुळे प्रेम वाढतं असं म्हटलं जातं. पण हीच भांडणं जेव्हा वाढू लागतात, तेव्हा मात्र, ती नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण बनतात. कित्येकदा ही भांडणं पुढे जाऊन इतकी वाढतात की, पती-पत्नीला अखेर न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येते. कौटिल्य या नावाने प्रसिद्ध असलेले आचार्य चाणक्य त्यांच्या धोरणांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. महान रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांच्या बळावर नंद वंशाचा नाश केला आणि एका साध्या मुलाला चंद्रगुप्त मौर्याला मगधचा सम्राट बनवलं. चाणक्यजींना केवळ राजकारणच नाही तर समाजातील जवळपास सर्वच विषयांची सखोल माहिती होती. आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्राची रचनाही केली आहे, ज्यामध्ये त्यांनी समाजातील जवळपास सर्वच विषयांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात पती-पत्नीच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे अनेकदा वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होतं. आचार्य चाणक्यजी यांनी या गोष्टींची तुलना स्लो पॉयझनशी करतात, ज्यामुळे शेवटी नातेसंबंध नष्ट होतात. या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या कशा टाळता येतील, जाणून घेऊया…

अहंकार : आचार्य चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीमधील नाते कमकुवत करण्यात अहंकार सर्वात मोठी भूमिका बजावतो. आचार्य चाणक्यजी मानतात की, पती आणि पत्नी दोघेही नात्यात समान आहेत. पती-पत्नीच्या नात्यात अहंकाराला स्थान नाही. एकदा नात्यात अहंकार आला की ते नातं बिघडतं.

शंका: पती-पत्नीच्या नात्यात संशयाला जागा नसावी, असं चाणक्यजींचं मत आहे. कारण शंकेमुळे अनेकदा नातं बिघडतं. नात्यात शंका आणि गैरसमज निर्माण झाले की ते पूर्णपणे तुटतात.

खोटे : आचार्य चाणक्य यांच्या मते खोट्याच्या आधारावर कोणतंही नातं चालू शकत नाही. नात्यात खोटं बोललं की त्यात अडचणी येऊ लागतात. अशा परिस्थितीत पती-पत्नीच्या नात्यात कधीही खोटं बोलू नये.

आदर आणि आदराचा अभाव: आचार्य चाणक्यजी मानतात की, पती-पत्नीच्या नात्यात आदर आणि सन्मान नसल्यामुळे नातंही तुटण्याच्या मार्गावर येते. या नात्यात दोघांबद्दल आदर आणि सन्मान असणं खूप गरजेचं आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These 4 things destroy married life know what acharya chanakya says in chanakya neeti prp