cauliflower disadvantages: हिवाळ्यात भरपूर भाज्या मिळतात. या हंगामातील बहुतांश भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. फ्लॉवर ही त्यामधीलच फळभाजी आहे जी लोक जास्त खातात. फ्लॉवरमध्ये कॅरोटीनोइड्स, फ्लेव्होनॉइड्स, एस्कॉर्बिक अॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी आणि आवश्यक खनिजे असतात जे शरीराला निरोगी ठेवतात. फायबर समृद्ध फ्लॉवरमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही ही भाजी गुणकारी ठरते. याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. याचे सेवन केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. अनेक वैज्ञानिक अभ्यास सांगतात की फुलकोबीमध्ये हायपोकोलेस्टेरोलिक संयुगे असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात.

Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

नित्यानंदम श्री हे योगगुरू आणि आयुर्वेदावर काम करणारे योग शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सांगितले आहे की कोबीच्या सेवनाने अंतर्गत अवयवांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. फुलकोबीमध्ये कोलीन असते जे यकृत आणि किडनीला संसर्गापासून वाचवते. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण कोबी आरोग्यासाठी उपयुक्त आहे, परंतु काही आजारांमध्ये कोबीचे सेवन आरोग्यावर विषासारखे काम करते. कोबी खाल्ल्याने काही आजारांमध्ये समस्या वाढू शकते, त्यामुळे यावेळी ही भाजी खाणे टाळा. चला जाणून घेऊया कोणत्या आजारांमध्ये फ्लॉवर खाणे टाळणे आवश्यक आहे.

(हे ही वाचा: ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ट्राय करा; खराब कोलेस्ट्रॉल पासून कायमस्वरूपी सुटका मिळेल)

युरिक अॅसिड जास्त असल्यास कोबी टाळा (uric acid patients avoid cabbage)

ज्या लोकांना यूरिक ऍसिड जास्त आहे त्यांनी फुलकोबीचे सेवन टाळावे. फुलकोबीमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी वाढते. याचे सेवन केल्याने गाउटची समस्या वाढू शकते.

किडनी स्टोनची समस्या असेल तर चुकूनही कोबी खाऊ नका kidney stone patients avoid cabbage)

ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी फ्लॉवरचे सेवन टाळावे. जर एखाद्याला लिव्हर आणि किडनीशी संबंधित काही समस्या असतील तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फ्लॉवरचे सेवन करावे.

ऍलर्जीच्या समस्या वाढू शकतात (Allergy problems can increase)

ज्यांना ऍलर्जीची समस्या आहे त्यांनी फ्लॉवरचे सेवन टाळावे.

( हे ही वाचा: ‘या’ रसांच्या सेवनाने किडनी स्टोन लघवीतून सहज बाहेर पडेल; ऑपरेशनची देखील गरज भासणार नाही)

जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर फ्लॉवर टाळा (If you have gas problem then avoid cauliflower)

आयुर्वेदिक तज्ञ नित्यानंदम श्री यांच्या मते, याचे रोज सेवन केल्याने गॅसची समस्या वाढू शकते. ते सहज पचण्याजोगे नसते. त्याचा प्रभाव थंड असतो, तो वायूचा कारक असतो, त्यामुळे पचायला जड असतो. लठ्ठ लोक ज्यांचे चयापचय मंद आहे, त्यांच्या सेवनाने समस्या वाढू शकते.

बद्धकोष्ठता वाढू शकते (Cabbage can increase constipation)

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी कोबीचे सेवन करू नये. थंड प्रभावाची कोबी बद्धकोष्ठतेची समस्या वाढवू शकते.