Health Tips: महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी या सवयी काढून टाकण्यावर आणि त्या सुधारण्यावर भर द्यावा, अन्यथा ही समस्या काळानुसार वाढू शकते. जाणून घेऊया कोणत्या अशा सवयी आहेत ज्या मासिक पाळीत अडथळा ठरतात.

मासिक पाळीवर परिणाम करणाऱ्या वाईट सवयी

१) खूप झोपणे

अमेरिकन मॉडेल रेचेल फिंचने खुलासा केला की, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीला जवळपास १२ तास झोपण्याची सवय होती. या सवयीमुळे तिच्या जीवनशैलीवर अनेक विपरीत परिणाम झाले, त्यापैकी एक म्हणजे दीर्घकाळ मासिक पाळी न येणे. त्यामुळे महिलांनी जास्त वेळ झोपू नये. आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी. गरजेप्रमाणे झोप घेतल्यास, तुमची मासिक पाळी देखील नियमित होईल.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
swapan sashtra dream interpretation about money gold silver
स्वप्नात भरपूर पैसा, सोन्या-चांदीचे दागिने दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

२) वजनात बदल

अचानक वजनात फरक दिसून आला, तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर देखील होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर तुमची मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते.

३) आहारात अडथळा

उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. जरी तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही तरीही तुमची मासिक पाळी वेळेवर येणे थांबू शकते. त्यामुळे सकस आहार खा. बाहेरील जंक फूड जास्त खाणे टाळा. ज्या पदार्थांत पोषक तत्वांचा समावेश असेल, असे पदार्थ खा. ज्यामुळे तुमची मासिक पाळी नियमित होईल. तसंच तुमच्या आरोग्यावर देखील याचा चांगला परिणाम होईल.

४) गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेक

अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाआधी किंवा लग्नांनंतर गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करतात. गर्भनिरोधक किंवा गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवते. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या घेणं सहसा टाळा.

५) ताण

तणावामुळे शरीराचे अनेक नुकसान होते. जसा आरोग्यासाठी ताण हानीकारक आहे, तसाच हा ताण पीरियड सायकलवर देखील परिणाम करू शकतो. तणाव कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा मासिक पाळीवर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होवू शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या शरीरावर देखील त्याचा चांगला परिणाम होईल.