संधिवात हा एक वेदनादायक प्रकार आहे जो रक्तातील यूरिक ऍसिडची पातळी वाढल्यावर होतो. रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढले की ते सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते आणि त्यामुळे वेदना होतात. शरीरात प्युरीन नावाची रसायनाचे विघटन झाल्यावर युरिक अॅसिड तयार होते. शरीरात प्युरीन्स आधीपासूनच असतात, परंतु काही पदार्थांमध्ये देखील आढळतात. सामान्यपणे, यूरिक ऍसिड शरीरातून मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते, परंतु जेव्हा मूत्रपिंड हे विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकण्यास असमर्थ असते तेव्हा ते सांध्यामध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते.
जास्त प्रथिने खाल्ल्याने यूरिक ऍसिड विकसित होण्याचा धोका वाढू शकतो. युरिक ऍसिड हे शरीरात बनवलेले एकप्रकारचे टॉक्सिन आहे जे प्रत्येकाच्या शरीरात तयार होते. जर तुम्ही जास्त मांसाहार करत असाल तर यूरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढण्याचा धोका असतो. मांसाहारामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. रात्रीच्या जेवणात प्युरीन युक्त मांसाहारी पदार्थ युरिक ऍसिडची पातळी झपाट्याने वाढवू शकतात. रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ युरिक ऍसिडची पातळी झपाट्याने वाढवतात हे जाणून घेऊया जे आहारातून वगळले पाहिजे.
( हे ही वाचा: हृदयविकाराच्या रुग्णांना अंडी खाल्ल्याने त्रास होतो का? जाणून घ्या याचे सेवन किती आणि कसे करावे)
मटणाचे हे विशेष भाग खाणे टाळा
जर तुम्ही मांसाहारी असाल तर मांसामधील यकृत आणि किडनी सारखे मास खाणे टाळा. या पदार्थांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, जे यूरिक अॅसिड वेगाने वाढवते. जर तुम्ही मांसाहाराच्या मदतीने प्रोटीन घेत असाल तर यूरिक अॅसिड वाढल्याने किडनी स्टोनचा धोकाही वाढू शकतो.
काही भाज्या रात्री खाल्याने वाढू शकतो त्रास
रात्रीच्या जेवणात काही भाज्या खाल्ल्याने समस्या वाढू शकते. रात्रीच्या जेवणात पालक, बटाटा, बीट आणि गाजरचे सेवन केल्याने तुमची युरिक ऍसिडची समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यांचे सेवन करणे टाळा. या भाज्या केवळ युरिक अॅसिडच वाढवत नाहीत तर किडनी स्टोनचा धोकाही वाढवतात.
( हे ही वाचा: ७० ते ८० वयोगटातील लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे? येथे जाणून घ्या)
लाल मांस खाणे टाळा
नॉनव्हेज खात असाल तर रात्रीच्या जेवणात डुकराचे मांस खाणे टाळा. हे लाल मांस तुमची समस्या वाढवू शकते.
सीफूड टाळा
काही प्रकारचे सीफूड जसे की शेलफिश, सार्डिन आणि ट्यूनामध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. सी फूड हे आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर असले तरी युरिक अॅसिडच्या रुग्णांनी ते टाळावे. मासे खाल्ल्याने संधिवातच्या रुग्णांना धोका निर्माण होऊ शकतो.