युरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. ही समस्या ५० वर्षे अधिक वयाच्या लोकांमध्ये जास्त दिसून येते. मात्र खराब आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार आता लहान वयाच्या लोकांना देखील होत चालला आहे. यूरिक ऍसिड हे शरीरात तयार होणारे एकप्रकारचे विष आहे, ज्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यूरिक ऍसिड वाढण्यासाठी आहारातील प्युरिनयुक्त पदार्थ पूर्णपणे जबाबदार असतात. रेड मीट, ऑर्गन मीट, सीफूड यासारख्या गोष्टी खाल्ल्याने युरिक ऍसिडचे प्रमाण झपाट्याने वाढते. अल्कोहोलच्या सेवनाने देखील युरिक ऍसिडची पातळी वाढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यामुळे ते सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या रूपात जमा होऊ लागते, ज्यामुळे सांध्यांना सूज आणि भयंकर वेदना होतात. याला गाउट देखील म्हणतात. यूरिक अॅसिड वाढण्यासाठी इतरही अनेक कारणे जबाबदार आहेत, जसे की लघवीशी संबंधित समस्या, किडनीच्या समस्यांमुळेही यूरिक अॅसिड वाढते. युरिक अॅसिड असलेले रुग्ण दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात अनेकदा प्युरीनयुक्त पदार्थ टाळतात, परंतु स्नॅक्समध्ये काही पदार्थ खातात ज्यामुळे यूरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढते. चला जाणून घेऊया स्नॅक्समधील कोणते पदार्थ यूरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी विषासारखे सिद्ध होतात.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा

( हे ही वाचा: मधुमेहामुळे डेंग्यूचा धोका वाढतो का? जाणून घ्या रक्तातील साखरेशी असलेला याचा संबंध)

बिस्किटे खाल्ल्याने युरिक ऍसिड वाढते.

दिवसभरात कधीही भूक लागली की अनेकांना सवय असते ती म्हणजे बिस्किटे खाण्याची. निरोगी व्यक्तीसाठी बिस्किटांचे सेवन फायदेशीर आहे, परंतु ज्यांना यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांच्यासाठी ते त्रास वाढवू शकते. कोणत्याही प्रकारचे यीस्ट यूरिक ऍसिड वाढवू शकते. ज्या लोकांना यूरिक ऍसिड जास्त आहे त्यांनी बिस्किटे खाऊ नयेत. त्यामध्ये जास्त प्रमाणात प्युरीन आणि फ्रक्टोज नसतात, परंतु यात कमी पोषक घटक असतात जे यूरिक ऍसिड वाढवू शकतात.

चॉकलेट, चिप्समुळे धोका वाढू शकतो

चॉकलेट आणि चिप्सचे सेवन केल्याने यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढू शकते. चॉकलेट दुधापासून बनवले जाते जे अजिबात खाऊ नये. याच्या सेवनामुळे युरिक ऍसिडची पातळी झपाट्याने वाढते. तळलेले पदार्थ आणि जंक फूडच्या सेवनाने युरिक ऍसिडची पातळी झपाट्याने वाढू शकते. तळलेले चिप्स आणि पापड खाल्ल्याने युरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढते.

Story img Loader