पावसाळा हा ऋतू आपल्यापैकी प्रत्येकालाच वेगवेगळ्या कारणांसाठी आवडत असतो. त्यात घरात राहून पाऊस अभुवायला आवडणाऱ्यांची संख्या जरा तुलनेनं जास्तच जाणवते. त्यातच आता करोनामुळे सुरु झालेलं अनेकांचं वर्क फ्रॉम होम अजूनही सुरु असल्याने जवळपास आपले सगळेच ऋतु घरात जात आहेत. अशावेळी तोचतोचपणा घालवण्यासाठी आणि थोडा बदल म्हणून कोणत्याही निमित्ताने घरात स्वतःच केलेले काही अगदी लहानसे बदल देखील मोठी मदत करू शकतात. आता निमित्त आहे पावसाळ्याचं. पावसाळयात अगदी सोपे बदल करून तुमच्या घराला आकर्षक रूप कसं शकता? हेच आज आपण पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कम्फर्ट

यंदाच्या पावसाळयात तुमच्या घरातील एक कोपरा स्पेशल आणि सर्वात आरामदायी बनवा. यासाठी अगदी मऊसूद रेशमी गालिचे, लहानसा सोफा किंवा मऊ आरामदायी खुर्चीचा वापर करा. ही जागा तुमच्या घराच्या खिडकीजवळ असू द्या. जेणेकरून वाफाळलेल्या चहाच्या कपसह या जागी रेलून बसण्यात, बाहेरचा रिमझिम पाऊस न्याहाळण्यात मिळणारं सुख तुम्हाला एक फिल्मी फील नक्की देईल.

ग्रीन हब

घरात ग्रीन हब तयार करा. तुम्ही यासाठी आकर्षक फुलझाडं आणि सुंदर, सजावटीच्या रोपांचा देखील समावेश करू शकता. या ग्रीन हबमुळे निश्चितच तुमच्या घरातील वातावरण अगदी फ्रेश राहील. विविध धातूंच्या विशेषतः पितळेच्या भांड्यांमध्ये या रोपांची लागवड करा. ज्यामुळे शोपीस किंवा सेंटरपीस म्हणून देखील याचा वापर होऊ शकेल.

प्रकाशयोजना

पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे घरात पुरेसा प्रकाश येत नाही. अशावेळी तुमच्या घरातील अंधाऱ्या कोपऱ्यांना उजळा. यासाठी तांब, पितळ अशा धातूंच्या फ्लोअर लॅंप्सचा कल्पकतेनं वापर करता. ही प्रकाशयोजना तुमच्या घराला निश्चितच एक नवं आणि आकर्षक रूप देईल.

गडद आकर्षक रंगांचा वापर

पावसाळ्यात बाहेरच्या वातावरणात सर्वत्र ग्रे अर्थात राखाडी आणि हिरव्या रंगांच्या छटा दिसतात. त्यामुळे घरात तुम्ही विविध आकर्षक रंगांचा जास्तीत जास्त वापर करा. सोफा, बेडशिफ्ट्स, कुशन कव्हर्ससाठी गडद रंगांचा वापर करा. खिडक्यांच्या पडद्यांसाठी बाहेरच्या निसर्ग सौंदर्याला उठून दिसेल असा चमकदार गडद पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा वापर करा. निसर्गाचा ताजेपणा घरात आणा.

सुगंध महत्त्वाचा

पहिल्या पावसानंतर येणाऱ्या मातीच्या सुगंध म्हणजे सुखच! पण याच हंगामात सततच्या दमट-ओल्या वातावरणामुळे परिसरात एक विचित्र आणि उग्र असा वास येत राहतो. तुम्हालाही निश्चितच हा अनुभव असेल. हेच टाळण्यासाठी आपल्या घरात अ‍ॅपल सिनेमन किंवा लव्हेंडर सुगंधाच्या मेणबत्त्या आणि डिफ्युझर्सचा वापर करा.