Sandalwood Oil Benefits: चंदनाचे तेल जगभरातील सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाते. त्वचेसाठी चंदन किती फायदेशीर आहे हे आपल्यापैकी अनेकांनी आजी-आजोबांकडून ऐकले असेलच. विशेषतः मुरुमांसाठी. पण तुम्हाला माहित आहे का की चंदनाचा वापर केवळ मुरुमांपासून सुटका करण्यासाठीच नाही तर त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केला जातो.
चला तर मग जाणून घेऊया त्वचेसाठी चंदनाच्या तेलाचे फायदे

१. पिंपल्स आणि काळे डाग काढून टाकते

चंदन तेल पिंपल्स आणि त्यांच्यामुळे होणारी जळजळ शांत करते. यासाठी चंदनाच्या तेलात हळद आणि कापूर मिसळा. आता हे पिंपल्सवर लावा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला यामुळे नक्कीच फरक मिळेल.

Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
How can handwashing affect your skin
Washing Hands Frequently : तुम्हाला सुद्धा सतत हात धुण्याची सवय आहे का? मग या सवयीचा त्वचेवर कसा परिमाण होतो डॉक्टरांकडून जाणून घ्या
make natural kumkum at home
भेसळयुक्त कुंकवामुळे केस पांढरे होत आहेत? मग घरीच बनवा नैसर्गिक कुंकू; जाणून घ्या पद्धत…
potato
टॅनिंगपासून सुरकुत्यांपर्यंत चेहऱ्यावरील समस्यांसाठी वापरा बटाटा, जाणून घ्या बटाट्याचे त्वचेसाठी फायदे
Beauty Benefits of Eggs
Eggs For Winter Skincare : हिवाळ्यात त्वचेसाठी अंड्याचा करा उपयोग आणि त्वचेची घ्या काळजी; वाचा, ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे
Cinnamon benefits: 5 Reasons Cinnamon Is Your New Best Friend During Your Period
Cinnamon benefits: महिलांनो आहारात आजच दालचिनीचा समावेश करा; मिळतील ‘हे’ कमाल फायदे
Losing More Hair Than Usual? This Iron-Rich Methi Pulao Might Help You hair loss home remedies
Hair loss: नेहमीपेक्षा जास्त केस गळतात? मेथीचा ‘हा’ पुलाव तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि फरक पाहा

२. चंदन एक्जिमावर उपचार करते

एक्जिमापासून मुक्त होण्यासाठी, तुम्हाला त्या भागावर चंदनाच्या तेलाचे १ ते २ थेंब टाकावे लागतील. यामुळे तुम्हाला काहीदिवसात फरक जाणवेल.

३. त्वचेवरील डाग दूर होतात

चंदनाच्या वापराने चेहऱ्यावरील डाग किंवा जखमाही नाहीशा होतात आणि त्वचा मुलायम होते. जर तुम्हाला यासाठी चंदनाचे तेल सापडत नसेल तर तुम्ही चंदन पावडर देखील वापरू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या त्वचेनुसार यात तेल मिक्स करायचे आहे आणि ते किमान १२ तास तसंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर चेहऱ्यावर या तेलाने मसाज करा आणि काही मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

४. घामोळ्याची समस्या दूर होते

चंदन थंडगार आहे, त्यामुळे ते त्वचेवर लावल्याने थंडी आणि आराम मिळतो. जर तुम्हीही उन्हाळ्यात घामोळ्याने हैराण असाल, तर चंदरची पेस्ट त्वचेवर लावा. अगदी लहान मुलांनाही तुम्ही हे लावू शकता.

५. अँटी-टॅनिंग गुणधर्म असतात

चंदनाचे तेल त्वचेच्या टॅनिंगपासून मुक्त होण्यास देखील मदत करते. यासाठी मध, लिंबाचा रस आणि दह्यात चंदनाचे तेल किंवा पावडर मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटे राहू द्या. कोरडे झाल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा

६. एंटी-एजिंग गुणधर्म असतात

चंदनाचे तेल त्वचा सैल होऊ देत नाही. हे अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे आणि फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानाशी लढते. ज्यामुळे सुरकुत्या पडत नाहीत. यासाठी चंदनाच्या तेलात मध आणि अंड्यातील पिवळ बलक मिसळावे लागेल. हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने धुवा.

( येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader