नवीन वर्ष जवळ येताच आपण चालू वर्षात ज्या गोष्टी, संकल्प पूर्ण करू शकलो नाही त्या सगळ्यांची यादी घेऊन नवीन वर्षात जात असतो. मात्र हळूहळू पुन्हा आपण दैनंदिन कामांमध्ये अडकतो आणि सर्व संकल्प तसेच राहतात. कामाच्या तणावामुळे असुदे किंवा इतर काही कारणांमुळे असुदे, तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित योजना नसते किंवा योग्य ती प्रेरणा मिळत नाही. परंतु, येणारे वर्ष वेगळे असेल कारण तुमचे संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे या ८ टिप्स असणार आहेत.
गुरुग्राममधील ऑरा स्पेशालिटी क्लिनिकच्या स्त्रीरोग संचालक आणि मॅक्स हॉस्पिटलमधील सह-संचालक डॉक्टर रितू सेठी यांनी हिंदुस्थान टाइम्स लाइफस्टाइलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपले संपूर्ण [शाररिक आणि मानसिक] आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ही काही सल्ले दिले आहेत. तुमचे संपूर्ण आरोग्य चांगले असल्यास तुम्ही ठरवलेले ध्येय, संकल्प पूर्ण करणे सोपे होऊ शकते, पाहा.
हेही वाचा : २०२४ या नवीन वर्षासाठी संकल्प तर ठरले; पण ते टिकवायचे कसे? या सात टिप्सची होईल तुम्हाला मदत
१. मानसिक आरोग्याला महत्त्व द्या
आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. आपल्या मनावर येणार ताण, कमी करण्यासाठी ध्यान लावावे. तुम्हाला आनंद देणाऱ्या आणि दगदगीतून विश्रांती मिळेल अशा गोष्टी कराव्या.
२. भरपूर पाणी पिणे
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक तेवढे पाणी पिणे गरजेचे असते. त्यामुळे दररोज भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. कामाच्या ठिकाणी किंवा इतर कुठेही जाताना सोबत पाण्याची बाटली नेहमी जवळ ठेवा.
३. आहाराचे नियोजन
आपल्या आहाराचे नियोजन करा. आहार ठरवताना, शक्य तितक्या पौष्टिक पदार्थांची निवड करा. बाहेरचे पदार्थ खाणे टाळण्याचा प्रयत्न करा.
४. दररोज व्यायाम करणे
व्यायाम करताना तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करा. जिममध्ये जाऊन, चालून, डान्स करून किंवा योगा करून तुम्ही दररोज थोड्यावेळासाठी शरीराची हालचाल होण्यासाठी व्यायाम करावा.
५. लहान गोष्टींकडे लक्ष द्या
तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या लहानातल्या लहान यशस्वी कामगिरींबद्दल आनंद साजरा करा. अशा लहान कामगिरींकडे लक्ष दिल्याने, तुम्हाला मोठ्या गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते.
हेही वाचा : बापरे! नवीन वर्षात मिळणार एवढे लॉन्ग वीकेंड्स! २०२४ च्या सर्व सुट्ट्यांचे आत्ताच प्लॅनिंग करून घ्या, पाहा…
६. चुकांमधून शिका
तुम्ही केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका; किंवा एखादी चूक तुमच्याकडून झाली म्हणून लगेच खचून जाऊ नका. उलट त्यांचा फायदा करून घ्या. तुम्ही केलेल्या चुकांना समजून घेऊन भविष्यात पुन्हा असं होणार नाही याची काळजी घ्या.
७. दररोज संकल्पांकडे लक्ष द्या
तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून जर तुम्ही तुमच्या ठरवलेल्या संकल्पांकडे पाहिलेत तर ते पूर्ण करण्यास फार अवघड होणार नाही.
८. तुमचे ध्येय पूर्ण करण्याकडे लक्ष द्या
आपण आपल्ये ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहोत अशी प्रतिमा डोळ्यासमोर कायम ठेवा. कधीकधी यशस्वी होण्याचा विचार करण्यानेसुद्धा एखाद्याला प्रचंड प्रोत्साहन मिळण्यास मदत होते.