जेवण बनवताना खाद्यपदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी दालचिनीचा वापर केला जातो. प्रत्येक स्वयंपाकघरात दालचिनी असतेच. पण याच्या नियमित सेवनाने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासूनही सुटकाही मिळू शकते हे बऱ्याच जणांना माहित नसते. दालचिनीमध्ये पॉलीफेनॉल असते, जे पोटाशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर ठरते. एवढेच नाही तर त्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल हे गुणधर्म आढळतात, जे वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत आरोग्याशी निगडित बाबींमध्ये फायदेशीर ठरतात. तसेच दालचिनीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने सांधेदुखीच्या समस्येपासुनही आराम मिळतो. असे अनेक फायदे असणाऱ्या दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्याने कोणते आरोग्यासाठी कोणते फायदे होतात आणि हे पाणी बनवण्याची प्रक्रिया काय आहे जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
जर तुम्ही तुमच्या वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर दालचिनीचे पाणी तुम्हाला खूप मदत करू शकते. दालचिनीचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिजम वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. विशेषत: सकाळी या पाण्याचे सेवन केल्यास वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी

आणखी वाचा : सफरचंद खाल्ल्याने शरीराला काय अपाय होऊ शकतो जाणून घ्या

रोगप्रतिकारकशक्ती वाढवते
दालचिनीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. दालचिनीमध्ये पॉलिफेनॉलसोबतच अँटी-व्हायरल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-फंगल हे गुणधर्मही आढळतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

सांधेदुखीची वेदना कमी करण्यास उपयुक्त
जर तुम्ही सांधेदुखीच्या वेदनांनी त्रस्त असाल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही दालचिनीच्या पाण्याचे सेवन करू शकता. यात मुख्यत्वे अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे शरीरातील वेदना आणि सूज कमी करतात.

पोटाशी संबंधित समस्यांवर फायदेशीर
दालचिनीचे पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळण्याबरोबर हे पाणी पचनसंस्था सुधारण्यासही मदत करते. ज्यामुळे पोट फुगल्यासारख्या समस्यांवरही लवकर आराम मिळु शकतो.

आणखी वाचा : अंडी उकडताना फुटू नयेत किंवा खराब होऊ नयेत यासाठी करा हे उपाय

दालचिनीचे पाणी बनवण्याची पद्धत
दालचिनीचे पाणी बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळून घ्या. पाणी उकळल्यानंतर त्यात दालचिनी पावडर किंवा दालचिनी वाटून टाका. हे पाणी थंड झाल्यानंतर त्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे मीठ मिसळा. यानंतर दालचिनीने पाणी पिऊ शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)