मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जेवणातील काही पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. यासाठी मधुमेह असणाऱ्यांना केवळ पौष्टिक पदार्थ खायला दिले जातात, पण सतत एकाच प्रकारचे किंवा रोज विशिष्ट अन्नपदार्थ खाल्ल्यास अशा व्यक्तींना त्याचा कंटाळा येऊ शकतो. मग अशावेळी नाश्त्याच्या वेळी बनवले जाणारे चमचमीत अन्नपदार्थ खाण्याचा मोह काही जणांना अनावर होतो. पण त्यामुळे तब्बेतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नाश्त्यामध्ये तुम्ही आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या तसेच साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा कोणते आहेत असे पदार्थ जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदाम
बदामामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळतात. त्यामुळे बदाम खाल्ल्याने शरीर निरोगी राहण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तज्ञांच्या मते बदाम खाल्ल्याने शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार होते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी नाश्त्यामध्ये बदामाचा समावेश करावा.

सफरचंद
सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात बी, सी, इ आणि पोटॅशिअम आढळते. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी सफरचंदाचा नाश्त्यात समावेश करणे फायदेशीर ठरेल.

Diabetes Diet : योग्य आहार घेतल्याने मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का? यावरील तज्ञांचे मत जाणून घ्या

शेंगदाणे :
‘जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार शेंगदाणे खाल्ल्याने टाईप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. शेंगदाण्यांमध्ये अनसॅच्युलेटेड फॅट आणि अनेक पोषक तत्त्व असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

उकडलेली अंडी :
अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. उकडलेली अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्ती नाश्त्यामध्ये उकडलेल्या अंडयांचा समावेश करू शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)