भारतीय पद्धतीने जेवण बनवताना त्यात अनेक मसाले वापरले जातात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे तमालपत्र. जेवणाचा सुगंध वाढवण्यासाठी आणि त्यात फ्लेवर आणण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. बिर्याणी, पुलाव, कडी अशा पदार्थांमध्ये तमालपत्र वापरलेले पाहिले असेल. तमालपत्राचे पिक कोणत्याही ठिकाणी घेता येते. तमालपत्रामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी, अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. आयुर्वेदामध्ये अनेक आजारांवरील घरगुती उपचार मानले जाणारे तमालपत्र आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.

अन्नपचनासाठी फायदेशीर
अन्नपचनासाठी घरगुती उपाय म्हणून तमालपत्र वापरले जाते. तमालपत्र स्वादूपिंड आणि पोटातील पचनक्रियेस उत्तेजित करते, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होऊन अन्नातील पोषक घटक नीट शोषले जातात. तमालपत्रामुळे पोटात जळजळ होणे, अपचन, गॅस, पोटात मळमळणे अशा समस्यांपासून सुटका मिळते.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते
तमालपत्र मधूमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तमालपत्राचा आहारात समावेश केल्यास ते साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, तसेच टाईप २ मधूमेहावर तमालपत्र गुणकारी औषध मानले जाते. यासह तमालपत्र शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते.

आणखी वाचा : पायांच्या स्नायूंमध्ये सतत वेदना जाणवतात का? ‘हे’ सोपे उपाय करून पाहा लगेच जाणवेल फरक

श्वसनाचे आजार
तमालपत्र श्वसनाच्या आजारांवरही गुणकारी मानले जाते. तमालपत्र श्वसनाच्या आजारांना शरीरापासून दुर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या तेलाचे स्रोत मानले जाते. ते अँटि ऑक्सिडंटचेही उत्तम स्त्रोत मानले जाते. यामुळे प्रदूषणामुळे हवेत निर्माण होणाऱ्या विषारी पदार्थांपासून फुफ्फुसांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत मिळते.

स्ट्रेस आणि एग्जायटी
एका रिसर्चमध्ये नमुद केल्याप्रमाणे तमालपत्र स्ट्रेस आणि एग्जायटीवर गुणकारी औषध मानले जाते. याच्या सुगंधामुळे ताण कमी होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते असे मानले जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)