वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाल्यानंतर अनेक टेक कंपन्यांनी वर्षभरातील गाजलेल्या कन्टेन्टची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरनंतर आता युट्यूबने २०१७मध्ये सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओजची यादी जाहीर केली आहे. तुम्ही या वर्षी जे व्हायरल व्हिडीओ पाहिलेत ते व्हिडीओ या यादीमध्ये नसतीलही कारण ही यादी जगभरातील युट्यूब युझर्सच्या आकडेवाडीच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. या दहा व्हिडीओंना एकूण ६३ कोटी ३० लाखांहून अधिक हिट्स मिळाले आहेत. म्हणजे हे व्हिडीओ पाहण्यासाठी नेटकऱ्यांनी एकूण ४ कोटी तास (चार हजार ५०० वर्षांहून अधिक काळ) खर्च केले आहेत.
या यादीमध्ये पहिले नाव आशियातील थायलंडमध्ये आयोजित होणाऱ्या एका गायन स्पर्धेतील सादरीकरणाचा आहे. या व्हिडिओला १८ कोटी १० लाखांहून अधिक हिट्स मिळाले आहेत. द मास्क सिंगर नावाच्या कार्यक्रमात स्पर्धकांना मुखवटा घालून गाणे गावे लागते. तुम्हीही पाहा युट्यूबवर २०१७मध्ये सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप टेन व्हिडिओ…
१)
Until We Will Become Dust – Oyster Masked THE MASK SINGER 2
२)
ED SHEERAN – Shape Of You | Kyle Hanagami Choreography
३)
Ping Pong Trick Shots 3 | Dude Perfect
४)
Darci Lynne: 12-Year-Old Singing Ventriloquist Gets Golden Buzzer – America’s Got Talent 2017
५)
Ed Sheeran Carpool Karaoke
६)
Lady Gaga’s FULL Pepsi Zero Sugar Super Bowl LI Halftime Show | NFL
७)
“INAUGURATION DAY” — A Bad Lip Reading of Donald Trump’s Inauguration
८)
history of the entire world, i guess
९)
In a Heartbeat – Animated Short Film
१०)
Children interrupt BBC News interview – BBC News