तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला २० हजार रुपयांच्या आत असलेला एखादा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला आज यासाठीच्या काही उत्तम पर्यायांबद्दल माहिती देणार आहोत. या यादीमध्ये पोको (POCO), रिअलमी (Realme), शाओमी (Xiaomi) आणि मोटोरोला (Motorola) या कंपन्यांच्या फोन्सचा समावेश आहे. या रेंजमध्ये सध्या १०८ एमपी कॅमेरा आणि १२० हर्ट्ज डिस्प्ले असलेले फोन आहेत. उपलब्ध आहेत. तर जाणून घेऊया या स्मार्टफोन्सची माहिती :
१) रेडमी नोट १० प्रो मॅक्स
शाओमीचा हा स्मार्टफोन यंदा मार्चमध्ये भारतात लाँच झाला होता. युझर्स हा फोन १९,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. या किंमतीत हा फोन ग्राहकांना १२०Hz रिफ्रेश रेटसह फुल-एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसर, ५,०२० एमएएच बॅटरी ३३ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि १०८ एमपी क्वाड कॅमेरा सेटअपसारखी फीचर्स देते.
२) मोटो जी ६०
मोटो जी ६० हा स्मार्टफोन भारतात यंदा एप्रिलमध्ये लाँच झाला होता. हा फोन १७,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या किंमतीत ग्राहकांना ६.८ इंच फुल-एचडी + डिस्प्ले १२०Hz रिफ्रेश रेट, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसर, १०८ एमपी ट्रिपल कॅमेरा सेटअप, ३२ एमपी सेल्फी कॅमेरा, ६,००० एमएएच बॅटरी आणि २० डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.
३) iQOO झेड३ – ५जी
iQOO झेड३ ५जी हा स्मार्टफोन भारतात यंदा जूनमध्ये लाँच झाला होता. या फोनची सुरुवातीची किंमत १९,९९० रुपये इतकी आहे. या किंमतीत युझर्सना हा स्मार्टफोन ६.५८ इंच फुल-एचडी+ (१,080×2,408 पिक्सेल) एलसीडी डिस्प्ले १२०Hz रिफ्रेश रेट, २.८GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६८जी प्रोसेसर, ६४MP ट्रिपल कॅमेरा सेटअप ४,४०० mAh बॅटरी आणि ५५W फास्ट चार्जिंग सपोर्ट देतो.
४) रिअलमी ८ प्रो
रिअलमी ८ प्रो हा स्मार्टफोन भारतात यंदा मार्चमध्ये लाँच झाला होता. युझर्स हा फोन १७,९९९ रुपयांत खरेदी करू शकतात. या किंमतीत हा स्मार्टफोन ग्राहकांना ६.४ इंच फुल-एचडी + (१,०८०x२,४०० पिक्सेल) सुपर एमोलेड डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर, १०८ एमपी क्वाड रियर कॅमेरा सेटअप, १६ एमपी सेल्फी कॅमेरा ४, ५०० एमएएच बॅटरी आणि ५० डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
५) पोको एक्स ३ प्रो
पोको एक्स ३ प्रो हा स्मार्टफोन भारतात यावर्षी मार्चमध्ये लाँच झाला होता. हे १८,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी केले जाऊ शकते. हा फोन १२०Hz रिफ्रेश रेट, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६० प्रोसेसर, ४८MP क्वाड कॅमेरा सेटअप, २०MP सेल्फी कॅमेरा, ५,१६०mAh बॅटरी आणि ३३W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६.६७ इंच फुल-एचडी+ (१,०८x२,४०० पिक्सल) डॉट डिस्प्लेला सपोर्ट आहे.